Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राला केंद्राचा पशुसंवर्धन निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार

योजनेंतर्गंत राज्यात ७९३ कोटींचे कर्ज वाटप; ५३ कोटींची व्याज सवलत प्रदान

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Animal Husbandry Fund Scheme

मुक्तपीठ टीम

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी  जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करणे व या योजनेबाबत जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकाविला.या उपलब्धीसाठी केंद्रीय मत्स्य,पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते आज राज्याला सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयाच्यावतीने येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ‘पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी संमेलनात’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध राज्यमंत्री डॉ.संजीव कुमार बालियान आणि विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्ये, उद्योजक आणि बँकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह आणि  प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेत जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी  व योजनेच्या जागरूकतेकरिता केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी यावेळी देशातील तीन राज्यांना गौरविण्यात आले. यात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह  यांनी पुरस्कार स्वीकारला. कर्नाटक राज्याला दुसरा तर उत्तरप्रदेशला  तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार वितरीत करण्यात आला.

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत ७९३ कोटींचे कर्ज वाटप– आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

केंद्र शासनाने पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी वर्ष २०२० मध्ये पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना सुरु केली. राज्यातील उद्योजकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला.राज्य शासनाकडे एकूण ९१६ अर्ज प्राप्त झाले होते यापैकी पात्र ७३ अर्जांमधून आतापर्यंत २६ अर्जांना मंजुरी देण्यात आली. या उद्योजकांना ७९३ कोटींचे कर्ज वाटप आणि ५३ कोटींची व्याज सवलत देण्यात आल्याचे आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले. या योजनेंतर्गत राज्य शासनाला एकूण १५ हजार कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्रातील 20 उद्योजकांचा सन्मान

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातील ७५ व्यक्ती व संस्थांना या संमेलनात गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातील २० व्यक्ती व संस्थांचा समावेश आहे.

या कार्यक्रमात ७५ पैकी प्रातिनिधिक १० उद्योजकांना केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री  पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्‍ते गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योर्तिलिंग मिल्क फुड आणि अहमदनगर जिल्ह्यातील जप्फा कॉम्फीड इंडिया लि. चा सन्मान करण्यात आला.

या मुख्य कार्यक्रमानंतर राज्यातील अन्य व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात कोल्हापूर जिल्ह्यातील गोविंद फिड मिल, रोहिणी सुचित्रा पोवार, अनुप श्रीनिवास पडमल या संस्था व व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले. पुणे जिल्ह्यातील विशाल अशोक मोकाशी, हुवेफार्मसी पुणे प्रा. लि, नेचर डिलाइट कॅटल फीड्स प्रा. लि., ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. यांना गौरविण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील कृष्णा डेअरी आणि  मुंबई  येथील  ग्रॅव्हिस फूड्स प्रा. लि. चा सन्मान करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील गौगंगा फूड प्रा. लि.,जलाराम व्हेटकेअर इंडस्ट्रीज प्रा. लि. तसेच सोलापूर जिल्ह्यातील गणेश रामचंद्र आपटे प्रा. लि. चा सन्मान करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील स्वामी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस् आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील मयुर प्रताप पाटील, दमयंती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. चा सन्मान करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील डेलेक्टो फूड्स प्रा. लि., बीड जिल्ह्यातील विमल ॲग्रो आणि सांगली जिल्ह्यातील एम. एस. बी जी चितळे यांनाही गौरविण्यात आले.

 


Tags: Animal Husbandry Fund SchemeFirst Rank Awardgood newsMaharashtra Centremuktpeethचांगली बातमीपशुसंवर्धन निधी योजनापहिला क्रमांक पुरस्कारमहाराष्ट्र केंद्रमुक्तपीठ
Previous Post

आजपासून २२वा भारत रंग महोत्सव, मुंबईत ५ नाटकं, २ नाटकं मराठीत!

Next Post

स्पार्क मिंडाचे दुचाकीस्वारांसाठी खास गिअर्स! १४५ प्रकारांसह १७ हेल्मेट मॉडेल्स!!

Next Post
Spark Minda

स्पार्क मिंडाचे दुचाकीस्वारांसाठी खास गिअर्स! १४५ प्रकारांसह १७ हेल्मेट मॉडेल्स!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!