मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. अखेर ११ महिन्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.जे जमादार यांनी देशमुखांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. गेल्या वर्षी २ नोव्हेंबररोजी ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी अटक केली होती. गेल्या ११ महिन्यांपासून ते ‘ईडी’ कोठडीत होते.
सीबीआयकडूनही त्यांना जामीन मिळणार का ?
- अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
- अनिल देशमुख यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये हा जामीन मिळाला असून अजून सीबीआयकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
- आता सीबीआयकडूनही त्यांना जामीन मिळणार का हे पाहावं लागेल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ईडी सर्वोच्च न्यायालय जाणार आहे. काही दिवसांआधी अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली होती. त्यांचा खांदा निखळलेला आहे. त्यांना उच्च रक्तदाब आणि विविध आजारही आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. आणि आज आखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.