मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार अनिल देसाई हे सौम्य स्वभावाचे मानले जातात. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे विश्वासू मानले असले तरी ते लो प्रोफाईल राहतात. परंतु सौम्य स्वभावाचे अनिल देसाई हे भाजपाविरोधातील सामन्यात आक्रमकतेने उतरले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देताना, “इफ्तार पार्टीत बिर्याणीवर ताव मारणाऱ्या फडणवीसांनाच ‘जनाब’ म्हटले पाहिजे,” अशी देसाई यांनी केली आहो.
राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर शिवसेनेकडून नाही!
- राजकारणासाठी शिवसेनेला हिंदुत्वाच्या कुबड्याची गरज नाही. आमची ओळख ही हिंदुत्व आहे.
- राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करण्याची इतरांना गरज आहे. शिवसेनेला याची गरज नसून इतरांना त्याची गरज आहे.
- ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहण्याची शिवसेनेला गरज नाही.
- बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मी)िरी पंडितांसाठी व तेथील प्रत्येकासाठी मोठं काम केले आहे.
- निर्वासित म्हणून आलेल्या काश्मिरी पंडितांची काळजी घेणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब होते.
इफ्तारमध्ये बिर्याणीवर ताव मारणारे जनाब फडणवीस!
- शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार अनिल देसाई नांदेड येथे आले होते.
- यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब असे संबोधणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही देसाई यांनी टीका केली.
- इफ्तार पार्टीत बिर्याणीवर ताव मारणाऱ्याला ‘जनाब’ म्हटले जाते, अशी टीका देसाई यांनी फडणवीसांवर केली.