Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधी सुल्ली आता बुल्ली बाई…मुस्लिम महिलांमध्ये का संताप?

January 2, 2022
in Uncategorized
0
BulliBai app

मुक्तपीठ टीम

सुल्ली डील्सनंतर आता बुल्ली बाई, या अॅपने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या अॅपला बुल्ली बाई (#BulliBai) या हॅश टॅगच्या नावाने ट्रोल केले जात आहे. तसेच या अॅपमुळे मुस्लिम महिलांमध्ये संताप पसरला आहे. या अॅपबाबत राजकीय वादही सुरू झाले असून प्रकरण पोलिसांच्या तपासापर्यंत पोहोचले आहे. अशा स्थितीत प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे की, ही सुल्ली डील्स आणि बुल्ली बाई म्हणजे काय?

 

मुस्लिम महिलांच्या संतापाचे कारण?

  • बुल्ली बाई अॅपमुळे मुस्लिम महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
  • अॅपचे निर्माते बेकायदेशीरपणे विविध सोशल मीडिया अकाउंटवरून मुस्लिम महिलांची छायाचित्रे गोळा करतात आणि त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहून त्यांची छायाचित्रे ट्रोल करतात.
  • यावर फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहेत. अॅपवर अनेक महिलांची छायाचित्रे आहेत, ज्यावर एका महिलेच्या छायाचित्रासह लिहिले आहे, ‘यु आर बुल्ली बाई ऑफ द डे’…. ही छायाचित्रे शेअरही होत आहेत.

 

सुल्ली डील काय आहे?

  • सु्ल्ली हा महिलांबद्दल वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे.
  • ४ जुलै २०२१ रोजी ट्विटरवर सुल्ली डील्सच्या नावाने अनेक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले.
  • अॅपवर ‘सुल्ली डील ऑफ द डे’ अशी टॅग लाइन होती आणि ती मुस्लिम महिलांच्या फोटोंसोबत शेअर केली जात होती. विशेष गोष्ट अशी की, ती गिटहबवर एका अज्ञात ग्रुपने तयार केली होती.

 

बुल्लीबाई हे नाव कोणत्या प्रकरणातून पुढे आले?

  • मुस्लीम महिलांच्या छायाचित्रांवरही सुल्ली डील्स होत आहेत, मात्र एका महिला पत्रकाराला लक्ष्य केल्यावर हे अॅप जगासमोर आले.
  • बेकायदेशीर मार्गांचा वापर करून अॅपवर त्यांचे फोटोही ट्रोल केले जात होते.
  • याबाबत माहिती देताना या महिला पत्रकाराने ट्विटरवर लिहिले की, मुस्लिम महिलांना नवीन वर्षाची सुरुवात भीती आणि द्वेषाच्या भावनेने करावी लागते.
  • यानंतर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले की, गिटहब या होस्टिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो अॅपवर अपलोड करण्यात आले आहेत.
  • त्यांनी हा मुद्दा मुंबई पोलिसांकडे मांडला आणि दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.
  • त्या म्हणाल्या, “मी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव जी यांना अनेक वेळा ‘सुल्ली डील्स’ सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे महिलांना लक्ष्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.”

 

अॅप तयार करण्यासाठी गिटहबचा गैरवापर

  • ‘बुली बाई’ अॅप गिटहब वर तयार करण्यात आला आहे.
  • हे एक होस्टिंग प्लॅटफॉर्म आहे जेथे ओपन सोर्स कोड आहे, परंतु आता गिटहब आणि त्यावर तयार केल्या जात असलेल्या अॅप्सबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

 

गिटहबने यूजर्संना केले ब्लॉक

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अॅप यूजर्सकडून धमकावणाऱ्याला गिटहबने ब्लॉक केले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ते म्हणाले की, गिटहबलाच रविवारी युजरला ब्लॉक करण्याची सूचना देण्यात आली आहे.


Tags: BulliBaiBulliBai appmuktpeethMuslim womensocial mediaSulli Dealsबुल्ली बाईमुक्तपीठमुस्लिम महिलासुल्ली डील्ससोशल मीडिया
Previous Post

नारायण राणेंना शंभूराज देसाई बत्ताशावरचा पैलवान म्हणाले! म्हणजे काय?

Next Post

वानखेडेंवरून आता पुन्हा मलिक विरुद्ध भाजपा! लॉबिंग की फसवणूक?

Next Post
nawab malik against bjp

वानखेडेंवरून आता पुन्हा मलिक विरुद्ध भाजपा! लॉबिंग की फसवणूक?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!