Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘स्टोरीटेलवर ‘अंधाराच्या हाका’ अभिनेता सुव्रत जोशीच्या आवाजात!

February 6, 2022
in घडलं-बिघडलं
0
StoryTel

मुक्तपीठ टीम

“अंधाराच्या हाका” या अत्यंत वेगळ्या ऑडिओ बुकचे लेखक संवेद गळेगावकर म्हणतात.. “हे माझं तिसरं पुस्तक स्टोरीटेलवर आलंय. या निमित्तानं जन्म आणि मृत्यु यांच्या दरम्यान अडकलेल्या विदेहींशी संवाद साधु शकणारा एक नवा नायक, अगस्त्य मुझुमदार, श्रोत्यांसमोर येत आहे. ऎन मध्यरात्री उमटणाऱ्या अमानविय आकृत्या, पडक्या वाड्यातून ऎकू येणारी कुजबुज, पावलांची उरफाटी सरसर यांचे रंगतदार किस्से न ऎकलेला माणूस विरळाच. अज्ञाताची भिती माणसाला कायमच आकर्षित करत आलेली आहे. आपल्या गुढकथा, भयकथांमधून रत्नाकर मतकरी, नारायण धारप ते थेट आताच्या हृषिकेश गुप्ते यांनी हे काहीसं काळं- करडं जग चांगलंच रंगवलेलं आहे. “अंधाराच्या हाकां”च्या निमित्तानं अगस्त्य मुझुमदारपण आता या जगात पाऊल टाकत आहे. निव्वळ सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा सामना अश्या टेम्ल्पेटाईज्ड कथांपलीकडे जाऊन अगदी विदेही पात्रांच्याही भावभावना मांडणं हा या कथांमधला आव्हानात्मक भाग. मायभुलीचे जाळे मधली मातृभावनेनं पछाडलेली विदेही असो किंवा भला बुरा है मधला निर्घृणतेच्या टोकाशी पोचलेला बुर्रा असो, “अंधाराच्या हाका”मधला हरैक विदेही पात्रात तुम्हाला मानवी स्वभावाच्या छटा सापडतील आणि हेच त्यांचं वेगळेपण आहे.”

 

ऑडीओबुक माध्यमात नॅरेटर फार महत्वाची भुमिका बजावतो. गूढकथा लेखनात संवेद गळेगावकर यांनी आपली छाप सोडली आहे. त्यांच्या ‘माया महा ठगनी’साठी लीना भागवत आणि आता “अंधाराच्या हाका”साठी सुव्रत जोशीसारखे रंगमंचावरचे कसलेले कलाकार लाभल्याने त्यांच्या या ऑडिओबुक्सना स्टोरीटेलवर विशेष लोकप्रियता मिळाली आहे. “अंधाराच्या हाका” साठी सुव्रतनं प्रत्येक टप्प्यावरचा अगस्त्य कमाल उभा केलाच आहे पण तुम्हाला मनापासून घाबरायचं असेल तर रात्रीच्या अंधारात सुव्रतनं उभे केलेले ‘विदेही’ एकट्यानं ऎकून बघाच असा सल्ला लेखक संवेद गळेगावकर यांनी त्यांच्या चाहत्यांना दिला आहे.

 

आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेता सुव्रत जोशीनं दिलेले आव्हान स्वीकारून, अमावास्येच्या रात्री, मिट्ट अंधारात हे ऑडीओबुक ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

 

अभिनेता सुव्रत जोशीच्या आवाजातील आणि संवेद गळेगावकर लिखित ‘ अंधाराच्या हाका’चे ऑडिओबुक स्टोरीटेलवर ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/books/andharachya-haka-s01e01-1546795


Tags: STORYTELSuvrat Joshiअंधाराच्या हाकासुव्रत जोशीस्टोरीटेल
Previous Post

‘लता’ नावामागची कहाणी: का बदललं पंडित दिनानाथ मंगेशकरांनी दीदींचं नाव?

Next Post

लता मंगेशकर : ज्या आवाजाला सुरुवातीला संधीही नाकारली गेली, तोच आवाज जगाला मंत्रमुग्ध करणारा ठरला!

Next Post
Lata Mangeshkar

लता मंगेशकर : ज्या आवाजाला सुरुवातीला संधीही नाकारली गेली, तोच आवाज जगाला मंत्रमुग्ध करणारा ठरला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!