मुक्तपीठ टीम
धावपळीच्या जीवनात झोप न येण्याच्या समस्येला आज प्रत्येकजण सामोरे जात आहे. बहुतेक लोक हा त्रास घेऊन डॉक्टरांपर्यंत पोहोचतात. यामागचे प्रमुख कारण म्हणजे आजची जीवनशैली आणि स्मार्टफोन, कॉम्प्युटर सारख्या उपकरणांचा वापर आहे. स्मार्टफोन, कॉम्प्युटरचे वेड हे केवळ लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही लागलं आहे. तसचं, हे जाणून आश्चर्य वाटेल की देशातील दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा देखील या गोष्टींना बळी पडले आहेत. सध्या, त्यांचे एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी याबाबत काही तरी म्हटलं आहे.
काय आहे आनंद महिंद्रांनी केलेले ट्वीट?
- देशातील दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांचे अनेक ट्विट रोज व्हायरल होत असतात.
- सोशल मीडिया यूजर्सनाही त्यांची पोस्ट खूप आवडते.
- झोपेच्या समस्येबाबत सध्या व्हायरल होत असलेले आनंद महिंद्रा यांचे ट्विट म्हणजे एका यूजरच्या पोस्टला रिप्लाय दिले आहे.
- संयुक्त राष्ट्राचे माजी पर्यावरण कार्यकारी संचालक एरिक सोल्हेम यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
- त्यांनी आनंद नावाच्या व्यक्तीची मीम शेअर केली ज्याला झोप येत नाही असे निदान झाले होते, आणि उपचार म्हणून डॉक्टरांनी सुचवले की आनंदने त्याचा कॉम्प्युटर आणि मोबाईल फोन फेकून द्यावा.
एरिक सोल्हेम यांच्या पोस्टला आनंद महिंद्रांचे गंमतीशीर उत्तर…
एरिक सोल्हेम यांच्या पोस्टला आनंद महिंद्रा यांनी मजेशीर उत्तर दिले आहे. महिंद्रांनी आपल्या विनोदी शैलीत या ट्वीटला रिट्वीट करत लिहिले की, “असे दिसते आहे की तुम्ही मला हे ट्विट करत आहात. माझ्या पत्नीनेही मला खूप पूर्वी असा सल्ला दिला आहे आणि तिच्याकडे कोणती वैद्यकीय पदवी देखील नाही.” आनंद महिंद्रा यांच्या या उत्तराला लोकांची पसंती मिळत आहे.