Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

हजारो किलोमीटरचे अंतर पार करत अमूर ससाणा पालघरमध्ये दाखल

December 28, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
अमूर ससाणा

मुक्तपीठ टीम

वर्षभरात सर्वाधिक लांब स्थलांतर करणारा पक्षी’ (२२,००० कि.मी हून अधिक) अशी विशेष ओळख असलेला अमूर फाल्कन हा हजारो किलोमीटरचे अंतर पार करत पालघर जिल्ह्यात विश्रांती साठी विसावला आहे पालघर मधील पक्षी मित्र, वन्यजीव छायाचित्रकार, पर्यावरण विज्ञान (Environmental science) चे विद्यार्थी वैभव हलदीपुर यांनी या सुंदर पक्ष्याची छबी कॅमेरा मध्ये केली आहे. अमूर फाल्कन समूहात स्थलांतर करणारा पक्षी आहे. पालघर मध्ये नर, मादी आणि त्यांचे पिल्लू असे कुटुंब गवतावर विसावले आहेत. काही दिवसातच हा पक्षी पुढील पुढील प्रवासासाठी शारीरिक रित्या सुदृढ होऊन काहीशा विश्रांती नंतर हा पक्षी अरबी समुद्र पार करून दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने झेप घेत पुढील प्रवासाला सुरुवात करेल.

Amur sasana

अमूर फाल्कन वर्षातून दोनदा ये-जा करतो. २०१७ नंतर तब्बल ४ वर्षांनी फाल्कन पालघर मध्ये स्थिरावला. विशेष म्हणजे ह्या पक्ष्याचा अर्धा मेंदू कायम सतर्क असतो. त्यामुळे फाल्कन सलग ४८ तासहून अधिक वेळ हा आकाशात उडू शकतो . भारतात अमूर, मर्लिन, शाईन आणि पेरिग्रीन असे चार प्रकारचे फाल्कन पाहायला मिळतात. कीटक, बेडूक किंवा काही वेळा छोटे पक्षी हे अमूर फाल्कनचे खाद्य आहे. रशिया मंगोलिया येथून अमूर फाल्कन भारतात नागालँड येथे दाखल होत तेथून प्रवास करत हे पक्षी पालघर आले असतील, असा अंदाज व्यक्त वर्तविला जात आहे.

 

याव्यतिरिक्त पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी आणि पाणथळ भागात तीनशेहून अधिक देशी-विदेशी पक्ष्यांचा वावर

पालघर जिल्ह्यातील वसई , विरार , दातीवरे, नांदगाव, दांडी, उनभात, चिंचणी, वरोर, वाढवण , बोर्डी झाई ह्या किनारपट्टी भागात, नॉन डिस्टरबिंग भाग म्हणजेच भाग असल्या कारणा मुळे हे पक्षी येथे ऑगस्ट पासून दिसायला सुरुवात होत असते ह्या पैकी दातीवरे आणि वाढवण किनाऱ्यावर यातले पक्षी हमखास दिसत असतात सुमारे ४० हुन अधिक पक्षांचा ह्या किनाऱ्यांवर वावर आढळून येत आहे ह्यातील काही पक्षी हे विणीच्या हंगामात त्यांच्या घरट्यांसह दिसून आले आहेत, तांबड्या छातीची हरोळी , कलहंस , नीलिमा , नवरंग , काळ्या डोक्याचा खंड्या , हळदीकुंकू बदक , नकेर , चातक , लाल कंठाची तिरचिमणी , चिंबोरी खाऊ , रेड नेक फॅलेरोप, पलास गल, उलटचोच तुतारी , सफेद मोठा कलहंस , रंगीत तुतारी , ग्रे-प्लॉव्हर , रिंग प्लॉव्हर , कास्पियन प्लॉव्हर , या सारखे इतर समुद्रपक्षी आणि पाणथळ भागात दिसणारे पक्षी पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागांत आणि पाणथळ भागांत दिसतं असतात.

 

समुद्रमार्गे किनारपट्टी भागात हजेरी

समुद्र मार्गे ओमान हुन उडान घेऊन थंडीच्या महिन्यात वाढवण किनारी चिंबोरी खाऊ तसेच उत्तर अमेरिकेहून रेडनेक फॅलेरोप , मंगोलिया हुन उडाण घेऊन कलहंस हा पक्षी वाढवण मधील पाणथळ भागात दिसून आला आहे उत्तर अमेरीकेहू रेड नेक फॅलेरोप हा पक्षी चिंचणी भागातील पाणथळ भागांत दिसून आला आहे तर ह्या पक्षांन प्रमाणे इतर ४० हुन अधिक स्थलांतरित पक्षी आपल्या पालघर जिल्ह्यात दिसून आले आहे तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात देशी आणि विदेशी पक्षी असे मिळून एकंदर तीनशे हून अधिक पक्षांच्या नोंदी पालघर मधील पक्षी मित्रांकडे आहेत आशा देशी विदेशी स्थलांतरित पक्षाच्या ठिकाणांचे जतन करणे गरजेचे असल्याचे पक्षी मित्रांकडून सांगण्यात येत आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Amur sasanaGoodNewsPalgharअमूर ससाणाचांगल्या बातम्यापालघर
Previous Post

नऊ वर्षाच्या चिमुरड्या धैर्याची कमाल, लाईव्ह शोमध्ये अवघ्या २६ मिनिटांमध्ये वधूचा मेकअप!

Next Post

भारतीय नौदलाने मिशन सागरच्या माध्यमातून जगभर केली मदत

Next Post
mission sagar

भारतीय नौदलाने मिशन सागरच्या माध्यमातून जगभर केली मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!