Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाई जगताप….अमृता फडणवीसांना का संताप? ‘अरे तुरे’ने केला उल्लेख!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
amruta fadanvis

मुक्तपीठ टीम

सत्तेत असताना पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वर्ग केल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी निशाणा साधला होता. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि बँकर अमृता फडणवीस यांनी ट्विट करून त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे अमृता फडणवीसांनी एकेरी उल्लेख करत जगतापांना प्रत्युत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस यांनी, “ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बँके’ ला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय”, असे ट्वीट केले आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटमधील भाई जगतापांच्या एकेरी उल्लेखांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

मिसेस फडणवीसांचा जगतापांवर का संताप?

राज्यात सध्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्याचा उल्लेख करत भाई जगतापांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला, “त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं, असे भाई जगताप यांनी म्हटले होते. त्यांचा हा प्रश्न भाजपाच्या सत्ताकाळात अॅक्सिस बँकेत अधिकारपदावर असणाऱ्या अमृता फडणवीस यांना चांगलाच झोंबला. त्यामुळे त्यांनी संतापून भाई जगताप यांना एकेरी भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

भाईंनी काढले आणि वहिनी संतापळ्या ते प्रकरण काय?

  • महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात दोन लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
  • त्यांचे वार्षिक पगार ११ हजार कोटींपेक्षा जास्त आहेत.
  • देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलीस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ या राष्ट्रीयकृत बँकेतून अ‍ॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती.
  • माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ‘अ‍ॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे फडणवीस सरकारने तसे केल्याचा संबंध जोडला जात होता.
  • त्यावेळी भाजपाने प्रत्युत्तर देताना अ‍ॅक्सिस बँक किंवा सरकारी खात्यांशी संबंधित कोणत्याही बँकांची निवड मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली होती, असे स्पष्टीकरण दिले होते.
  • फडणवीस म्हणाले होते, “एखाद्याला असं वाटतं, की माझी पत्नी त्या बँकेत काम करते, म्हणून ते माझ्या सरकारची बदनामी करु शकतात, तर तसं होणार नाही.”
  • “माझी पत्नी कधीच सरकारी कार्यालयात आली नाही किंवा पाच वर्षांत एखाद्या सरकारी अधिकाऱ्याशी तिने भेट घेतलेली नाही,” असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं होतं.

Tags: amruta fadanvisbhai jagtapdevendra fadanvisअनिल देशमुखअमृता फडणवीसअॅक्सिस बँकदेवेंद्र फडणवीसभाई जगताप
Previous Post

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

आरक्षणाचं प्रमाण ठरवणं राज्याचाच विशेषाधिकार! कर्नाटकाच्या भूमिकेमुळे मराठा आरक्षण मागणीस बळकटी!

Next Post
supreme court 2

आरक्षणाचं प्रमाण ठरवणं राज्याचाच विशेषाधिकार! कर्नाटकाच्या भूमिकेमुळे मराठा आरक्षण मागणीस बळकटी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!