मुक्तपीठ टीम
पूर्वी गुणांवरून पुढील भवितव्य ठरवलं जात असे परंतु, आता कोणतेही क्षेत्र असो गुणांबरोबर बुद्धिमता आणि कौशल्य हे जरूरीचे झाले आहे. त्यात तरूणाईचा कल हा व्यवसाय आणि नवीन उघ्योग कल्पनांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. यासाठी एक रिअॅलिटी शो ही आहे. शार्क टँक इंडिया असे या शोचे नाव आहे. लवकरच त्याचा दुसरा सीझन सुरू होणार आहे. या शोच्या प्रमोशनसाठी सर्व जज कौन बनेगा करोडपती-१४ मध्ये हजर झाले होते. या शोमध्ये अमिताभ बच्चन यांना भन्नाट ऑफर मिळाली आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्याच स्टाईलमध्ये एक नवीन बिझनेस आयडिया शार्क टॅंकच्या जजेससमोर ठेवली, जी ऐकून सगळे हसू लागले. अमन गुप्ता, अनुपम मित्तल, अमित जैन, पियुष बन्सल, नमिता थापर आणि विनिता सिंह यांना कौन बनेगा करोडपती शोमध्ये आमंत्रित करण्यात आले होते.
बिग बींच्या कल्पनेवर १०० कोटी खर्च करण्याची तयारी!
- बिग बींनी आपल्या व्यवसायाची कल्पना सर्व जजेससमोर मांडली.
- त्यानंतर त्यांना या कल्पनेवर १०० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली.
- या एपिसोडचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
काय म्हणाले ‘बिग बी’? ज्यामुळे सर्वांना हसू झाले अनावर…
- प्रोमोमध्ये बिग बी एंट्री घेतात आणि म्हणतात, आम्ही खास महिलांसाठी एबी टिश्यू आणले आहेत.
- या उत्पादनाच्या चाचणीची पहिली फेरीही झाली आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या उत्पादनात गुंतवणूक करू शकाल की नाही?
- यावर शार्क टॅंकचे जज म्हणतात, जर तुमच्या नावाचा एबी टिश्यू जगात विकला गेला तर आम्ही नक्कीच १०० कोटी रुपये खर्च करू.
- हे ऐकून बिग बींनी हात जोडले आणि गमतीने म्हणाले, “सर एक गोष्ट आहे मला १०० कोटी रुपयांपैकी २५% सायनिंग अमाउंट मिळेल का सर?”
- हे ऐकून सर्वांना आपले हसू अनावर झाले.
कौन बनेगा करोडपतीच्या या एपिसोडचा प्रोमो सोनी इंडियाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “व्यवसाय जगतातील मोठे शार्क ज्ञानाच्या मंचावर आले आणि त्यांच्यासमोर अमिताभ बच्चन जी त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत.”