Thursday, October 1, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याकरिता आवश्यक सोयीसुविधांबाबत माहिती त्वरित पाठवावी”

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

May 12, 2021
in सरकारी बातम्या
0
Amit deshmukh

मुक्तपीठ टीम

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागाने कोरोना उपचारांकरिता लहान मुलांसाठी विशेष कक्ष तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याबाबतची माहिती त्वरित पाठवावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

 

मंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगिक उपाययोजना करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग शास्त्र विभागातील प्राध्यापक व विभागप्रमुख यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता आणि बालरोगशास्त्र प्रमुख उपस्थित होते.

 

मंत्री देशमुख म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून यामध्ये लहान मुलांना धोका अधिक आहे असे वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आवश्यक खबरदारी म्हणून प्रत्येक शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात लहान मुलांसाठी विशेष कक्ष तयार करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा यांच्यासह वेगवेगळ्या उपाययोजना, विशिष्ट औषधांची यादी याबाबतची माहिती सर्व अधिष्ठाता यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे त्वरित पाठविण्यात यावी.

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांची काळजी आणि उपचार याला प्राधान्य देत असताना वैद्यकीय महाविद्यालयातील लहान मुलांच्या कक्षात तातडीने सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी विशेष कक्ष आहे तेथे अजून कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे याची यादी पाठवण्यात यावी. सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून टिपणी मिळाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालक या सर्व टिपणीचा अभ्यास करून लहान मुलांसाठी कोरोना अनुषंगाने करण्यात येणारी उपचारपद्धती आणि व्यवस्थापन याबाबत निश्चित धोरण करतील, असेही देशमुख यांनी सांगितले.

 

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असलेल्या मुलांना करण्यात येणारे उपचार, समुपदेशन यावर भर देताना लहान मुलांचे पालक यांचे सुद्धा समुपदेशन करण्यात यावे, जेणेकरून रुग्णालयातून लहान मुले घरी गेल्यानंतर त्यांना कोणताही त्रास होणार नाही. येणाऱ्या काळात शासकीय रुग्णालयांत टेली काउन्सिलिंग आणि हेल्पलाइन सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असेही मंत्री देशमुख यांनी सांगितले.


Tags: amit deshmukhcoronaअमित देशमुखकोरोना
Previous Post

“कोरोना प्रतिबंधक लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करावे!”: नाना पटोले

Next Post

“राज्यात १५ दिवसात युरियाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा”- कृषीमंत्री दादाजी भुसे

Next Post
dadaji bhuse

"राज्यात १५ दिवसात युरियाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा"- कृषीमंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!