मुक्तपीठ टीप
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी नुकतीच वेरुळ लेण्यांजवळील ऐतिहासिक मालोजीराजे भोसले गढीला भेट दिली. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी संबंधित ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धनासाठी सरकारकडून आवश्यक ते सर्व कऱण्याची घोषणा केली.
औरंगाबादपासून ३५ किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध वेरुळ लेणी आहेत. मालोजी राजेंची गढी ही मालोजी राजेंशी संबंधित एक किल्ला होता. मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा होते.
भेटीनंतर सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी मालोजीराजे गढीच्या जीर्णोद्धार व संवर्धनासाठी राज्य सरकार पुरेशा निधीची तरतूद करेल, ग्वाही दिली. या ऐतिहासिक स्थानाकडे काहीसे दुर्लक्षच झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच अशा स्थानाबद्दल राज्यच नाही तर राष्ट्रीय स्तरावरही माहिती दिली जाण्याची आवश्यक्ता त्यांनी व्यक्त केली.
देशमुख यांनी सरकारी अधिकाऱ्यांना गढीच्या जागेवर माहिती फलक उभे करण्यास आणि इतर व्यवस्था करण्यास सांगितले. ते म्हणाले, “राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी ही जागा एक आदर्श ठिकाण ठरू शकते. स्थानिक कलाकारसुद्धा येथे त्यांची कलागुण प्रदर्शित करू शकतात,”.
मालोजीराजे गढाजवळील दमदम तलावाला वारसा टॅग देण्याची व मराठा इतिहासासाठी समर्पित अभ्यास केंद्र सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी देशमुखांकडे केली.
पाहा व्हिडीओ: