Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनवाढीच्या मागणीवर शासन सकारात्मक विचार करेल

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची ग्वाही

March 9, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Amit deshmukh

 

मुक्तपीठ टीम

राज्यातील वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी विविध स्तरांवरुन होत असून राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग या मागणीवर सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली.

सुनिल प्रभू, वैभव नाईक, राजन साळवी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले की, कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे सांस्कृतिक, कला, मनोरंजन क्षेत्रावर आभाळ कोसळले, या क्षेत्रातील कलावंतांच्या उपजिविकेचा प्रश्न भागविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व घटकांसाठी मदतीचा हा निर्णय असून जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी प्राधिकृत केले आहे. ते नावे तपासून शासनाला सादर करतील असे सांगून आपल्या क्षेत्रातील गरजू कलावंतांना मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करण्याचे आवाहनही मंत्री अमित देशमुख यांनी केले.

राज्यातील पात्र वृद्ध साहित्यिक आणि कलावंत मानधन योजनेंतर्गत प्रतिवर्शी प्रत्येक जिल्ह्यातील सन्मानार्थी निवडीचा इष्टांक ६० वरुन १०० वर करण्यात आला असून सदस्यांची मागणी लक्षात घेता या इष्टांकाच्या धोरणाचा पुनर्विचार करुन व्याप्ती वाढविण्यात येईल, मर्यादेमुळे कुणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वही देऊन कोरोनाकाळात घोषित केलेले सहाय्य कलावंतांना देण्यासाठी जलदगतीने कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, यात दिरंगाई आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही अमित देशमुख यांनी यावेळी दिला.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या समित्यांची पुनर्रचना करण्यात येईल असे सांगून कलावंतांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विधानसभा सदस्यांची लवकरच बैठक घेऊन सूचनांचा समावेश धोरणात करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी सांगितले.

आंदोलनप्रकरणी लोककलावंतांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा करणार

लोककलावंतांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते, याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले असून हे गुन्हे मागे घेण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. यावेळी सभागृहात उपस्थित गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही या सूचनेवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार, ॲड. आशिष शेलार, भास्कर जाधव आदी सदस्यांनी सहभाग घेतला.


Tags: ajit pawarAmit deshamukhbalasaheb thoratCM Udhav thackeraydevendra fadanvisdilip walse patilअजित पवारअमित देशमुखउद्धव ठाकरेदिलीप वळसे पाटीलदेवेंद्र फडणवीसबाळासाहेब थोरात
Previous Post

“उद्धवजी, एक दिवस तुम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल!” भाजपाच्या नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठीच्या मोर्चात फडणवीसांनी सुनावलं

Next Post

रशियाXयुक्रेन: झेलेन्स्की दोन पावलं मागे, नाटोमध्ये सामील होण्याचा हट्ट सोडला, आता तडजोडीची शक्यता?

Next Post
zelenski

रशियाXयुक्रेन: झेलेन्स्की दोन पावलं मागे, नाटोमध्ये सामील होण्याचा हट्ट सोडला, आता तडजोडीची शक्यता?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!