Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विविध सांस्कृतिक पुरस्कारांची सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुखांकडून घोषणा

June 1, 2022
in सरकारी बातम्या
0
Amit deshmukh

मुक्तपीठ टीम

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेदरम्यान विविध पुरस्कार घोषित करीत असतानाच चित्रपट, नाटक आणि संगीत यांचे समीक्षण करणाऱ्यांचाही सन्मान करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही यावेळी मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.            

महाराष्ट्रातील गायन आणि संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना दरवर्षी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो.  सन २०२१-२२ या वर्षाचा पुरस्कार पं.हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर करण्यात आला आहे.  शास्त्रीय संगीत क्षेत्रात गायन आणि वादन यामध्ये प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.  सन २०२१-२२ या वर्षाचा पुरस्कार दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककला क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास ‘विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो. सन २०१९-२० या वर्षाचा पुरस्कार आतांबर शिरढोणकर यांना तर सन २०२०-२१ या वर्षाचा पुरस्कार संध्या माने यांना जाहीर करण्यात आला आहे. रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर’ यांच्या नावे रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. सन २०२०-२१ या वर्षाचा पुरस्कार  दत्ता भगत यांना तर सन २०२१-२२या वर्षाचा पुरस्कार सतिश आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास दरवर्षी ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येतो. सन २०२०-२१ या वर्षाचा पुरस्कार  लता शिलेदार ऊर्फ दिप्ती भोगले यांना तर सन २०२१-२२ या वर्षाचा पुरस्कार सुधीर ठाकुर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पाचही पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे आहे.            

सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंत व्यक्तींना सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप १ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. नाटक या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी कुमार सोहोनी आणि सन २०२०-२१ साठी गंगाराम गवाणकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीत या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी पंडितकुमार सुरुसे आणि सन २०२०-२१ साठी कल्याणजी गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीत या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी शौनक अभिषेकी आणि सन २०२०-२१ साठी देवकी पंडित यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाद्यसंगीत या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी सुभाष खरोटे आणि सन २०२०-२१ साठी ओमकार गुलवडी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी सन २०१९-२० साठी मधु कांबीकर आणि सन २०२०-२१ साठी वसंत इंगळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. किर्तन/समाजप्रबोधन या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी ज्ञानेश्वर वाबळे आणि सन २०२०-२१ साठी गुरुबाबा औसेकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तमाशा या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी शिवाजी थोरात आणि सन २०२०-२१ साठी सुरेश काळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शाहीरी या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी शाहीर अवधुत विभूते आणि सन २०२०-२१ साठी दिवंगत शाहीर कृष्णकांत जाधव यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नृत्य या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी शुभदा वराडकर आणि सन २०२०-२१ साठी जयश्री राजगोपालन यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोककला या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी सरला नांदुलेकर आणि सन २०२०-२१ साठी कमलबाई शिंदे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजन या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी मोहन मेश्राम आणि सन २०२०-२१ साठी गणपत मसगे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कलादान या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी अन्वर कुरेशी आणि सन २०२०-२१ साठी देवेंद्र दोडके यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.            

आज जाहीर करण्यात आलेले पुरस्कार लवकरच सर्व पुरस्कारार्थींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतील असेही मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.


Previous Post

परिचारिकांनी आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

Next Post

महिलांच्या विकासाचा महामार्ग माविम

Next Post
MAVIM

महिलांच्या विकासाचा महामार्ग माविम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!