मुक्तपीठ टीम
शाश्वत आणि शुद्धता यांचे प्रतिक असलेल्या खादीने जागतिक फॅशन विश्वात मोठी भरारी घेतली आहे. अमेरिकेतील ग्लोबल फॅशन ब्रँड, ‘पॅटागोनिया’ आता डेनिम कपडे तयार करण्यासाठी हाती बनवलेल्या खादी डेनिमचा उपयोग करत आहे. पॅटागोनियाने, वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या नामांकित अरविंद मिल्सद्वारे एक कोटी ८० लाख रुपये किमतीच्या सुमारे ३० हजार मीटर खादी डेनिम कापडाची गुजरातमधून खरेदी केली आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने अहमदाबादमधील अरविंद मिल्स समवेत जुलै 2017 मध्ये खादी डेनिम उत्पादनाचा जगभरात व्यापार करण्यासाठी करार केला. तेव्हापासून अरविंद मिल्स, गुजरातमधील केव्हीआयसी प्रमाणित खादी संस्थांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात खादी डेनिम कापडाची खरेदी करत आहे.
पॅटागोनियाच्या खादी डेनिम खरेदीमुळे, खादी कारागीरांसाठी अतिरिक्त एक लाख ८० लाख मनुष्य तास म्हणजेच २७ हजार ७२० मानव दिवस कामाची निर्मिती झाली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये कामाची ऑर्डर नोंदवण्यात आली आणि नियोजित १२ महिन्याच्या काळात म्हणजेच या ऑक्टोबरमध्ये याची पूर्तता करण्यात आली.
दर्जा तपासूनच खादी डेनिमची निवड
- खरेदीला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी पॅटागोनियाने, जागतिक मुल्यांकन करणाऱ्या एनईएसटी, नेस्ट या अमेरिकास्थित त्रयस्थ कंपनीची नियुक्ती केली.
- गोंडाळ इथे डेनिम उत्पादनाच्या संपूर्ण प्रक्रियेचे म्हणजेच कताई, विणणे, कार्डिंग,डायिंग, मजुरी, मजुरांच्या वयाची पडताळणी यासारख्या उत्पादनाशी निगडीत संपूर्ण प्रक्रियेचे मुल्यांकन करण्यासाठी ही त्रयस्थाची नियुक्ती करण्यात आली.
- नेस्टने उद्योग भारती इथे सर्व निकषांचे मुल्यांकन केल्यानंतर कताई आणि हातमाग विणकाम, नेस्टचे हस्तकला सील साठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र दिले.
- देशातल्या खादी संस्थेच्या कार्यव्यवहारात, नैतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी आंतरराष्ट्रीय त्रयस्थ मुल्यांकन कर्त्याकडून, प्रमाणपत्र आणि मुल्यांकनाची ही पहिलीच वेळ आहे.