Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टीव्ही नियमांमध्ये सुधारणा, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी कायदेशीर यंत्रणा

केंद्र सरकारकडून स्व-नियामक संस्थांना मंजुरी मिळणार

June 19, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
tv rules

मुक्तपीठ टीम

केबल टीव्ही नेटवर्क नियम १९९४ मध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने सूचना जारी करून टीव्हीच्या विविध वाहिन्यांद्वारे प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या संदर्भातील नागरिकांच्या तक्रारी आणि गा‌‍ऱ्हाणी सोडविण्यासाठी केबल टीव्ही नेटवर्क नियम १९९५ मधील तरतुदींनुसार कायदेशीर यंत्रणा उभारायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विविध टीव्ही चॅनल्सचा समावेश असलेल्या स्व-नियामक संस्थांना केंद्र सरकारकडून कायदेशीर मान्यता दिली जाणार आहे. त्यामुळे सामान्य प्रेक्षकांच्या तक्रारींना वाव मिळणार आहे आणि काही चॅनल्सच्या मनमानीवरही अंकुश येण्याची शक्यता वाढणार आहे.

 

सध्या नागरिकांच्या टीव्हीवरील कार्यक्रम अथवा जाहिराती संहिता नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित तक्रारी सोडविण्यासाठी आंतर- मंत्रालयीन समितीच्या स्वरूपातील संस्थात्मक यंत्रणा अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे, तक्रार निवारणासाठी, विविध प्रसारकांनी त्यांच्या प्रणालीअंतर्गत स्व-नियामक यंत्रणा विकसित केल्या आहेत. मात्र, तक्रार निवारण संरचना अधिक मजबूत करण्यासाठी कायदेशीर यंत्रणा उभारण्याची गरज भासू लागली होती. काही प्रसारकांनी, त्यांच्या संघटना किंवा संस्थांना कायदेशीर मान्यता देण्याची विनंती केली होती. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील “कॉमन कॉज विरुध्द भारत सरकार आणि इतर” या २००० मधील खटल्यावरील WP(C) क्र. ३८७ आदेशात तक्रार निवारणासाठीच्या केंद्र सरकारच्या विद्यमान यंत्रणेबाबत समाधान व्यक्त करतानाच तक्रार निवारण यंत्रणेला औपचारिक स्वरूप देण्यासाठी योग्य नियमांचा आराखडा तयार करण्याचा सल्ला दिला होता.

 

वरील पार्श्वभूमी लक्षात घेऊन पारदर्शक आणि नागरिकांना लाभदायक ठरणारी कायदेशीर यंत्रणा स्थापन करण्यासाठी केबल टीव्ही नेटवर्कच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याच वेळी, विविध प्रसारकांच्या स्व-नियामक संस्थांची केंद्र सरकारकडे नोंदणी करण्याची पद्धत देखील सुरु करण्यात आली आहे.

 

सध्या, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ९००हून अधिक वाहिन्यांना परवानगी दिली आहे. या सर्व वाहिन्यांना केबल टीव्ही नेटवर्क नियमामध्ये आखून दिलेली कार्यक्रम आणि जाहिरात संबंधी संहिता पाळणे अनिवार्य आहे. वरील सूचना अत्यंत महत्त्वाची आहे कारण त्यामुळे तक्रार निवारणाच्या सशक्त संस्थात्मक प्रणालीसाठी अनुकूल मार्ग तयार करतानाच, प्रसारक आणि त्यांच्या स्व-नियामक संस्थांना विश्वासार्हता आणि जबाबदारी पाळण्याचे कर्तव्य नेमून दिले आहे.


Tags: cable tv rulestvtv channelsटीव्हीटीव्ही चॅनल्सभारत सरकार
Previous Post

“देशाचा कायदा सर्वोच्च, ट्विटरचे धोरण नव्हे!”

Next Post

रेल्वे मुंबईतील परळ, महालक्ष्मी मैदानं खासगी बिल्डरना लीजवर देणार!

Next Post
railway

रेल्वे मुंबईतील परळ, महालक्ष्मी मैदानं खासगी बिल्डरना लीजवर देणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!