मुक्तपीठ टीम
अॅम्ब्रेन या भारतातील लोकप्रिय मोबाइल अॅक्सेसरीज ब्रँडने डॉट्सट्यून इयरबड्स लाँच केले आहेत. हा टीडब्लूएसचा विस्तार मानला जात आहे. २९ तासांपर्यंत काम करण्याची क्षमता असणारे हे इयरबड्स आहेत. भारतात हे इयरबड्स लाँच झाले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे जशी अॅलेक्सा आपल्या सूचना ऐकून काम करते तसे हे इअरबड्सही करतील.
सूचना ऐकणारे इयरबड्स!
- व्हॉईस कमांड सपोर्ट म्हणजेच आपण बोलुन दिलेल्या सूचनांचे पालन डॉट्सट्यून इयरबड्स करणार.
- याची बॅटरी २९ तासापर्यंत चालते.
- इयरबड्स अल्ट्रा इन-इअर कम्फर्टसह उपलब्ध आहे.
- पांढरा, काळा आणि गुलाबी या ३ रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.
- इयरबड्स गुगल असिस्टंट आणि सिरी या दोन्हींसाठी व्हॉइस असिस्टंट अॅक्टिव्हेशनसह उपलब्ध आहे.
एक वर्षाच्या गॅरंटीसह सवलतीत उपलब्ध
- अॅमेझॉन , फ्लिपकार्ट आणि टाटाक्लि्कवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
- १० मिमी स्पीकर ड्रायव्हर्स आहे.
- इयरबड्सची वास्तविक किंमत २१९९ रुपये आहे परंतु अधिकृत साइटवर ते १५९९ रुपयांना उपलब्ध आहे.
- यावर १ वर्षाची वॉरंटी आहे.
सोबत ड्यूअल मायक्रोफोनही
इयरबड्स कानामध्ये व्यवस्थिती फिट होतात. ते दिवसभर कानात राहिले तरी त्रास होणार नाही असे आरामदायी बनवले असल्याचा कंपनीचा दावा आहे. कॉलसाठी प्रत्येक इअरबडवर ड्यूअल मायक्रोफोन आहेत. मल्टी-फंक्शनल टच सेन्सरही यात उपलब्ध आहे. मल्टी-फंक्शनल टच सेन्सरद्वारे कॉल आणि गाणी सहजपणे ऍक्सेस केले जातात. ते पाणी प्रतिरोधक असल्याने जिम करताना येणाऱ्या घामाची चिंता करण्याची गरज नाही.