मुक्तपीठ टीम
शिवडी पोलिस ठाण्यात अॅमेझॉन इंडियाच्या दोन कर्मचार्यांवर कंपनी आणि त्याच्या ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल आरोप दाखल केला आहे. ग्राहकांना महागड्या वस्तूंच्या जागी स्वस्त वस्तू दिल्याचा आरोप केला आहे. प्रारंभिक चौकशीत असे दिसून आले आहे की, त्यांनी कंपनीतून किमान 10 लॅपटॉप चोरले आहेत.
वारिस खान (२०), वाजिद खान (२१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ते ई-कॉमर्स जाइंट मध्ये पॅकिंग बॉयचे काम करत होते. ग्राहकांनी मागवलेल्या वस्तू कंपनीच्या गोडाऊन मध्ये ठेवल्या जातात. हल्लीच अॅमेझॉन इंडियाला त्यांच्या दिल्ली ऑफिसमधून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची माहिती समजली. त्यांनी मागवलेल्या वस्तू त्यांना मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. एका तक्रारी मध्ये असे आढळले की, ग्राहकाने चार लॅपटॉप मागवले होते पण त्यांना त्यांच्या बदल्यात चार चार्जर मिळाले.
पोलीसांनी सांगीतले यासाठी दोन कर्मचारी जबाबदार आहेत ते गोडाऊन मधून या वस्तूंची अदलाबदल करीत होते. या केसची पडताळणी करत असताना असे लक्षात आले की कंपनीतून निघत असताना त्यांच्याकडे मोठे पार्सल होते पण ते गोडाऊन मध्ये पोहोचेपर्यंत ते पार्सल लहान झाले होते. पोलिसांनी सांगितले की हे लोक दुकानातून बरोबर वस्तू नेऊन दुसऱ्या कमी किमतीच्या वस्तूंसोबत त्या वस्तूंची अदलाबदल करतात आणि ग्राहकांना चुकीच्या वस्तू पोहोचवतात.
ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ३.३० लाखांचा आमचा तपास चालू आहे आणि आरोपींनी उत्पादनांसोबत काय केले आणि इतर किती ग्राहकांना फसवले आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. या कर्मचार्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४०८, ४२० आणि ३४ अन्वये फसवणूकीचा आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.