मुक्तपीठ टीम
भारतातील आघाडीची औद्योगिक आणि स्वयंचलन बॅटरी कंपनी असलेल्या अमारा राजा बॅटरीज लिमिटेड (“कंपनी”)ने आज ई-दळणवळणासाठी प्रमुख नाविन्यपूर्ण बॅटरीचे उत्पादक आणि युरोपियन तंत्रज्ञान विकसक असलेल्या इनोबॅट ऑटो मध्ये गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे आज जाहीर केले.
या सुरुवातीच्या गुंतवणुकीतून अमारा राजाला वाढत्या युरोपियन इलेक्ट्रिक वाहन परिसंस्थेत महत्वाचा ठसा उमटविण्याची संधी मिळेल. तिथे त्या भागातील इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रसारासाठी असंख्य बॅटरी कारखाने उभारले जात आहेत. यामध्ये युकेचाही समावेश आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्याची मोठी गरज तिथे दिसून येत आहे.
हे धोरणात्मक पाऊल अमारा राजाला ठळकपणे सक्षम करेल. यावर्षी सुरुवातीला त्यांनी ‘ऊर्जा आणि दळणवळण’ या त्यांच्या ठळक धोरणाचा एक भाग म्हणून हरित तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची महत्वाकांक्षा सादर केली होती. इ-मोबिलीटी साठीच्या बॅटरी उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञान मिळवायला त्यांना या कौशल्याची मदत होईल. तेथील गुंतवणूक कंपनीसाठी नवीन संशोधन आणि विकास क्षेत्र खुले करेल तर आधीपासूनच कार्यरत असलेल्या बाजारपेठेत अमारा राजाला इनोबॅटचे उच्च नाविन्यपूर्ण बॅटरी तंत्रज्ञान अंगीकार करायला अनुमती देईल.
स्वयंचलन, व्यावसायिक वाहने, मोटरस्पोर्ट आणि एरोस्पेस विभागांत ग्राहकांच्या विशिष्ट गरजांच्या पूर्ततेसाठी ग्राहकांना हव्या तशा प्रीमियम नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक बॅटरीजची सोय, संशोधन, विकास आणि उत्पादन करण्यात इनोबॅटची विशेषता आहे. जबाबदार इएसजी चौकटीत “क्रॅडल-टू- क्रॅडल” धोरण अंगिकारताना इनोबॅटचे ध्येय इलेक्ट्रिक दळणवळण सुविधा अंमलबजावणी करणे हे आहे.
इनोबॅट सध्या स्लोव्हाकिया मधील व्होडेरॅडी येथे बॅटरी संशोधन आणि विकास केंद्र आणि उत्पादन केंद्र विकसीत करत आहे. या प्रकल्पाच्या पुढच्या पायरीत उत्पादनक्षमतेवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून युरोप आणि जगभरात अनेक गिगा फॅक्टरीजची योजना आहे. याला महत्वाची युरोपियन युटीलिटी कंपनी सीईझेड आणि जागतिक पातळीवरील बडी मायनिंग कंपनी रिओ टीन्टो सारख्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या मजबूत भागीदारांचे पाठबळ आहे.
अमारा राजा बॅटरीजचे कार्यकारी संचालक विक्रम गौरीनेनी म्हणाले, “इनोबॅट मधील आमची गुंतवणूक जाहीर करताना आम्ही खूप भारावून गेलो आहोत. थोड्याच कालावधीत नाविन्यपूर्ण बॅटरी तत्वज्ञान विकसीत करण्याची आपली क्षमता इनोबॅटने सिद्ध करून दाखवली आहे. त्यांचा क्रॅडल-टू- क्रॅडल दृष्टीकोन शाश्वततेवरील अमारा राजाच्या स्वतःच्या ध्येयांना पाठबळ देत आहे आणि क्लिष्ट कच्च्या मालाच्या आयातीवरील दीर्घ कालीन अवलंबित्व कमी करायला मदत करेल. आमच्या दोघांचे संबंधित क्षेत्रातील सामर्थ्य एकत्रित करून जागतिक पातळीवर उभरत्या ईव्ही बाजारपेठेत अमारा राजा स्वतःचा ठसा उमटवू शकेल. आम्ही एकत्रितपणे अमारा राजा कार्यरत असलेल्या बाजारपेठांसाठी इनोबॅटने विकसीत केलेल्या अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याकरता भविष्यातील संधींचा मागोवा घेऊ. हे तंत्रज्ञान निश्चितपणे भारताच्या स्वतःच्या इलेक्ट्रिक वाहन महत्वाकांक्षेला गती आणि चालना देऊ शकेल असा आम्हांला विश्वास आहे.”
इनोबॅट ऑटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी मरियन बोसेक म्हणाले, “इनोबॅट आणि युरोपच्या विविध भागांतील तिच्या नियोजीत गिगा फॅक्टरीज साठी आजची घोषणा धोरणात्मकदृष्ट्या महत्वाची आहे. उभरत्या बाजारपेठांचा समावेश करून जागतिक पातळीवर इ-दळणवळण सुविधा अंगिकारल्या जाण्यासाठी अशा वैशिष्ट्यपूर्ण सहयोगी भागीदाऱ्या महत्वाच्या आहेत. पुढे जाऊन, आपल्या आगामी विस्तारासाठी आणि आपल्या स्वतःच्या क्रॅडल-टू- क्रॅडल दृष्टीकोनाच्या उपयोजनासाठी मार्ग तयार करत आहे. अमारा राजा बरोबर भागीदारी करताना आम्हांला खूप आनंद होत आहे. त्यांनी यशस्वी व्यवसाय उभारणी केली असून हिंदी महासागराच्या भौगोलिक टापूतील उभरत्या बाजारपेठांमध्ये या काही वर्षांत समकालीन ऊर्जा साठवणूक तंत्रज्ञान सादर करण्याचा अनुभव गाठीशी मिळवला आहे. आपल्या सर्वांसाठीच एक चांगले, शाश्वत भविष्य निर्माण करायला मदत होण्यासाठी सर्वाधिक सक्षम, सर्वोत्तम बॅटरीज निर्माण करण्याकरता एकत्र काम करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.”
About Amara Raja Batteries Limited
Amara Raja Batteries Limited is an Energy and Mobility enterprise and one of the largest manufacturers of energy storage products for both industrial and automotive applications in the Indian battery industry.
In India, Amara Raja is the preferred supplier to major telecom service providers, Telecom equipment manufacturers, the UPS sector (OEM & Replacement), Indian Railways and to the Power, Oil & Gas, among other industry segments. Amara Raja’s industrial battery brands comprise PowerStack®, AmaronVolt® and Quanta®. The Company is a leading manufacturer of automotive batteries under the brands Amaron® and PowerzoneTM, which are distributed through a large Pan-India sales & service retail network.
The Company supplies automotive batteries under OE relationships to Ashok Leyland, Ford India, Honda, Hyundai, Mahindra & Mahindra, Maruti Suzuki, and Tata Motors. The Company’s Industrial and Automotive Batteries are exported to countries in the Indian Ocean Rim.
About InoBat Auto
InoBat Auto specialises in the pioneering research, development, manufacture, and provision of premium innovative electric batteries custom-designed to meet the specific requirements of global mainstream and specialist OEMs within the automotive, commercial vehicle, motorsport, and aerospace sectors. A European based battery manufacturer, InoBat already has a battery research and development facility and pilot line under development in Slovakia. InoBat is backed by a strong consortium of investors and technology companies, including strategic investors and partners such as Rio Tinto, CEZ, IPM, Matador, AEN, CSG, MSM Group, and Across. InoBat has also beenapproved for grant financing under the EU sponsored programme, Important Projects for Common European Interest, and already received a grant from the Slovak Government.
For more information: www.inobatuto.eu