Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पुराव्याशिवाय अनैतिक संबंधांचा आरोप ही क्रूरताच!”

दिल्ली उच्च न्यायालयाने करून दिली जाणीव

March 24, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
delhi high court

मुक्तपीठ टीम

जोडीदारावर विवाहबाह्य आरोपांची गंभीर दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली आहे. जोडीदारावर विवाहबाह्य संबंधाचा बिनबुडाचा आरोप हा जोडीदाराच्या चारित्र्यावर, प्रतिष्ठेवर आणि आरोग्यावर गंभीर आघात करणारा असतो. त्यामुळे मानसिक त्रास होतो, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे आरोप म्हणजे क्रूरतेच्या बरोबरीचे आणि घटस्फोटाचे कारण देखील असू शकते. न्यायालयाने म्हटले की, विवाहबाह्य संबंधांचे आरोप गंभीर असतात, ते अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे.प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांच्या खंडपीठाने एका महिलेची याचिका फेटाळताना आपल्या निकालात ही निरक्षणे नोंदवली.

 

महिलेचे पती व सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप…

  • कौटुंबिक न्यायालयाने हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १३(१)(आयए) अंतर्गत पतीच्या बाजूने घटस्फोट घेण्याचा आदेश दिला होता.
  • न्यायालयाने महिलेचे आरोप निराधार मानले.
  • महिलेने पतीवर गंभीर आरोप लावले आहेत, तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत, तो दारू पितो आणि तिला आत्महत्या करण्यास भाग पाडतो.
  • महिलेने सासरच्या मंडळींवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला असून, घरातील इतर सदस्य हुंड्यासाठी छळ करत आहेत.
  • मात्र, सुनावणीवेळी यातील एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही.
  • लग्न हे एक पवित्र नाते आहे, त्याची शुद्धता ठेवण्याची गरज आहे. अशाप्रकारे चारित्र्यावर खोटे आरोप करणे ही क्रूरता आहे.
  • त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयामध्ये दखल देण्याचे आम्हाला काहीही कारण दिसत नाही, असे न्यायमूरातींनी म्हटले आहे.

 

नेमकं प्रकरण काय आहे?

  • २०१४ साली या जोडप्याचे लग्न झाले होते.
  • लग्नाच्या काही काळानंतर दोन्ही पक्षांमधील परस्पर संबंध बिघडले होते.
  • २०१७ मध्ये पतीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटोसाठीअर्ज केला होता.
  • जो २०१९ मध्ये संजूर झाला.
  • ही महिला सामाजिक विज्ञान शिक्षिका असून तिचा पती एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर असल्याचे सांगितले जात आहे.

Tags: Delhi High CourtExtramarital AffairLawअनैतिक संबंधकायदादिल्ली उच्च न्यायालय
Previous Post

“सोमय्या सांगाच…नारायण राणे, कृपाशंकर सिंह यांच्यावरील आरोपांचे काय झाले?”

Next Post

फडणवीसांच्या स्टिंग बाँब पेन ड्राईव्हचा तपास सीआयडीकडे!

Next Post
Devendra fadnavis with pendrive

फडणवीसांच्या स्टिंग बाँब पेन ड्राईव्हचा तपास सीआयडीकडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!