उदयराज वडामकर/ कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये गायरान मधील अतिक्रमण काढण्यासाठी निर्णयाला स्थगिती मिळविण्या साठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चाचे आव्हान सतेज पाटील यांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद.
न्यायालयाने शासनाला अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्याने राज्य शासनाने अतिक्रमण काढण्याच्या निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या वतीने पंधरा दिवसाची अतिक्रमण धारकांना नोटीस त्यांच्या दारावरती लावून अतिक्रमण काढण्याविषयी नोटीस बजावण्यात आली आहे.
या निर्णयामुळे त्यांची अंमलबजावणी करण्याचा सर्व पक्ष सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्याने गायरानातील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून पंधरा दिवसाची मुदत ही देण्यात आली आहे. जागा खाली करण्यास भाग पाडले आहे. प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे . या निर्णयाने लाखो नागरिक बेघर होणार या निर्णयाचा पुनर्विचार करावा या करिता या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .
या महामोर्चा मध्ये गावागावातून चांगला प्रतिसाद मिळाला यामध्ये महीलाचा सहभाग जास्त होता. दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चा जिल्हाधिकार्यालयावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच सर्वपक्षीय नेत्यांची या निर्णयाबाबत भाषणे ही झाली .