मुक्तपीठ टीम
जर तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांनी एक अलर्ट जारी केला आहे. एक धोकादायक मालवेअर तुमच्या डिव्हाइसमधील तुमचा डेटा स्क्रिन रेकॉर्डरच्या माध्यमातून चोरू शकतो आहे. तज्ज्ञांनी या मालवेअरला ‘वल्चर’ असे नाव दिलं आहे, जे आपल्या डिव्हाइसच्या स्क्रिनवर येणारी प्रत्येक माहिती रेकॉर्ड करते. याचा अर्थ असा की लॉग-ईन आणि पासवर्डपासून इंटरनेट हिस्ट्री, बँक तपशील आणि अगदी आपले खासगी टेक्स्ट संदेश आणि सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीपर्यंत सर्व काही रेकॉर्ड केलं जाऊ शकतं.
पेगॅससपेक्षाही धोकादायक असे ‘वल्चर’ बँकिंग ट्रोजन मालवेअर!
- ‘वल्चर’ एक बँकिंग ट्रोजन आहे (बँकेचे तपशील चोरणारे मालवेअर)
- ‘वल्चर’ हे इतर बँकिंग ट्रोजनपेक्षा अगदी वेगळे आहे.
- इतर मालवेअर जेथे वापरकर्त्यांकडून बनावट वेबसाईटद्वारे खात्याचे तपशील भरायला लावतात आणि नंतर त्या माहितीचा वापर करून चोरी करतात.
- ‘वल्चर’ मात्र थेट वापरकर्त्याच्या मोबाइलची स्क्रिन रेकॉर्ड करून खात्याची माहिती चोरतो.
- याचा अर्थ असा की आपण मूळ वेबसाईटवर लॉग इन केले तरीही आपली फसवणूक होऊ शकते.
.
अँड्रॉइड यूजर्सची चिंता वाढवणारे मालवेअर
- स्क्रिनवरील सर्व माहिती होऊ शकते रेकॉर्ड
- या मालवेअरला ‘वल्चर’ असे नाव देण्यात आले आहे.
- लॉग-ईन, पासवर्ड, इंटरनेट हिस्ट्री, बँक तपशील यासोबत आपले खासगी टेक्स्ट, संदेश आणि सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी पर्यंत सर्व काही रेकॉर्ड केलं जाऊ शकतं.
- आपण ऑफिशिअल वेबसाईटवर लॉग इन केले तरीही आपली फसवणूक होऊ शकते.
- अँड्रईड यूजर्ससाठी हा जटील प्रश्न आहे.
या अॅपद्वारे पसरला मालवेअर
- मोबाईल सिक्युरिटी वेबसाइट थ्रेट फॅब्रिकच्या तज्ज्ञांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये अलर्ट जारी केला आहे.
- हे मालवेअर या वर्षी मार्चमध्ये समोर आले आहे.
- हे मालवेअर गुगल प्ले स्टोअरवरील अॅपद्वारे पसरवण्यात आले आहे, जे हजारो वेळा डाउनलोड झाले आहे.
- ‘प्रोटेक्शन गार्ड’ या अॅपवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
- पण गूगल प्ले स्टोअरवरून हे अॅप काही काळासाठी काढून टाकण्यात आले आहे.