मुक्तपीठ टीम
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्विटरवर ही माहिती दिली आहे. यामुळे तो पहिल्या दिवशी कान्सच्या रेड कार्पेट कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. पूजा हेगडे, एआर रहमान, शेखर कपूर आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासमवेत तो भारतीय दलाचे प्रतिनिधीत्व करणार होता पण कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला भाग घेता येणार नाही.
अक्षय कुमारने ट्विट करून माहिती दिली
- अक्षय कुमारने ट्विटरवर लिहिले की, “कान्स २०२२ इंडिया पॅव्हेलियनमध्ये आमच्या सिनेमासाठी मी खरोखरच उत्सुक होतो, पण दुर्दैवाने मला कोरोनाची लागण झाली आहे.
- त्यामुळे आता मी विश्रांती घेईन. अनुराग ठाकूर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. मला तिथली खरोखरच आठवण येईल. .”
अक्षय दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह झाला
अक्षयला कोरोना पॉझिटिव्ह आढळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी राम सेतूच्या शूटिंगदरम्यान, कलाकार आणि क्रूमधील अनेक लोकांची कोरोना पॉझिटिव्ह चाचणी झाली होती, ज्यामुळे एप्रिल २०२१ मध्ये शूटिंग पूर्णपणे थांबवण्यात आले होते.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अक्षय सहभागी होऊ शकणार नाही
- १७ मे रोजी ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनाच्या दिवशी चित्रपटातील व्यक्ती रेड कार्पेटवर चालणार होत्या.
- प्रसिद्ध लोकगायक मामे खान, अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि वाणी त्रिपाठी, दोन वेळा ग्रॅमी विजेते संगीतकार रिकी केज आणि सीबीएफसी चेअरमन प्रसून जोशी हे देखील महोत्सवातील भारतीय दलाचा भाग आहेत. मात्र आता अक्षय या महोत्सवात येऊ शकणार नाही.
- अक्षय कुमारचा आगामी चित्रपट पृथ्वीराज हा ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा आहे, ज्यामध्ये त्याने संजय दत्त, सोनू सूद आणि मानुषी छिल्लर यांच्यासोबत काम केले आहे.
- या चित्रपटातून मानुषी छिल्लर डेब्यू करणार आहे.
- नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, ज्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.
- या चित्रपटातील गाणीही रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा चित्रपट ३ जून रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे.