Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आर्थिक दुर्बल महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षणासाठी ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ योजना

अमरावतीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानं योजनेला खरी सुरुवात

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे

मुक्तपीठ टीम

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवती व महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत अमरावती व नागपूर विभागातील युवती व महिलांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या प्रशिक्षण प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी व नवगुरूकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअर, दिल्ली यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सामंजस्य करार करण्यात आला.

रोजगाराविषयी प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करुन रोजगार प्राप्त होईपर्यंत सहभागी महिला प्रशिक्षणार्थींचे सातत्याने समुपदेश करावे. प्रेरणादायी सत्र, उद्योजक कंपन्यांचे भरती मेळावे व विषय तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे नियमित आयोजन करावे. प्रशिक्षणानंतर रोजगार प्राप्त होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबाबत सकारात्मकता या महिलांमध्ये निर्माण करावी, अशा सूचना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दिल्या. ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’या कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षरी करण्यात आल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.

जिल्हाधिकारी पवनीत कौर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक प्रदीप घुले, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी के विसाळे, प्रविण आत्राम, प्रबोधिनीचे संचालक गजेंद्र बावणे, नवगुरूकुल फाऊंडेशनच्या संचालक निधी अनारकत आदी यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पातंर्गत प्रशिक्षणासाठी विज्ञान शाखेत पदवी प्राप्त युवती व महिलांना संधी देण्यात येणार असून त्यांची प्रवेशासाठी निवड करीत असतांना पालकांना प्रशिक्षणाबाबतचे नियम, निवासाबाबत असलेली सुरक्षितता, भोजन व आदी बाबींची माहिती देण्यात यावी. दुर्बल घटकातील महिलांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्थिरता प्रदान होईल असा विश्वास श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केला.

अमरावती, नागपुर विभागातील प्रशिक्षणासाठी इच्छुक 5 हजार 465 महिलांनी नोंदणी केली असून 2 हजार 224 महिलांनी ऑनलाईन चाचणी परीक्षा दिली. त्यापैकी 1 हजार 307 महिलांनी ही चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रवेशासाठी चार टप्प्यांमध्ये चाचणी परीक्षा घेण्यात येणार असून प्रवेशाबाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केद्रांचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी दिली.

 


Tags: Akanksha Kaushalyatun JeevonnatikadeamravatiEconomically weak girlgood newsMoUmuktpeethwomen self-employment trainingअमरावतीआकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडेआर्थिकदृष्ट्या दुर्बल युवतीघडलं-बिघडलंचांगली बातमीमहिला स्वयंरोजगार प्रशिक्षणमुक्तपीठसामंजस्य करार
Previous Post

जंगलात लाकूड गोळा करायला गेलेल्या महिलेचं उजळलं नशीब… हाती लागला २० लाखांचा हिरा!

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत ‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना…

Next Post
har ghar tiranga

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत 'या' आहेत मार्गदर्शक सूचना...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!