मुक्तपीठ टीम
देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम शिळा मंदिराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कार्यक्रमाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पण या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान! सुप्रिया सुळे
- अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावं अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती.
- पण पीएमओने त्याला काही उत्तर दिलं नाही.
- हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे.
- अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.
- त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
- हे जे झालं ते अयोग्य आहे.”
- “प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे.
- त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते.
- पण त्यांना बोलू दिलं नाही.”
प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे योग्य नाही- प्रवीण दरेकर
- या घटनेसंदर्भात बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे योग्य नसल्याचे सांगितले.
- हा कार्यक्रम राजकीय नव्हता.
- वारकऱ्यांच्या या कार्यक्रमात वारकऱ्याला बोलू दिल ही बाब मोठी आहे.
- प्रोटोकॉलचा प्रश्नच नाही.
- देहू संस्थानने कार्यक्रम घेतला.
- पीएमओ कार्यालय ठरवत नाही कुणी भाषण करायचे.
अजित पवार हे फडणवीसांसारखे भाषणासाठी हापापलेले नसतात…अमोल मिटकरी
- दरेकरांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
- यावर मिटकरी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे वारकरी नाहीत ते राजकीय पुढारी आहेत.
- हे बालिश आणि हास्यास्पद वक्तव्य असल्याचे भाजपा म्हणत असेल तर सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री कार्यालयातून आलेली माहिती पत्रकारांनी दिली आहे.
- उपमुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या प्रोटोकॉलचे पालन झालेले नाही.
- अजित पवार हे फडणवीसांसारखे भाषणासाठी हापापलेले नसतात.
- दोघांमध्ये खूप फरक आहे.
- अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील तर पंतप्रधान मोदींनी त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करायला पाहिजे होती.
- भाजपाने आणि त्यांच्या आध्यात्मिक आघाडीने महाराष्ट्राची माफी मागावी.
भाजपाच्या सांगण्यावरून अजित पवारांची बोलण्याची संधी डावलली- रविकांत वरपे
- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
- “देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेण्यासाठी आणि त्यांचे राज्याच्या वतीने स्वागत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे पुणे विमानतळावर हजर होते.
- राज्याच्या वतीने पंतप्रधानांचे त्यांनी स्वागत केले आणि देहू येथील कार्यक्रमात उपस्थित राहिले.
- हा राज्याचा राजशिष्टाचार मा.ना.अजितदादा पवार यांनी पाळला असून पंतप्रधान कार्यालयाने त्यांचा राजशिष्टाचार का पाळला नाही?
- “राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या पंतप्रधान कार्यालयाने नकार देणे हे कोणत्या पंतप्रधान कार्यालयाचा कोणत्या राजशिष्टाचारात बसते?
- अजितदादांच्या भाषणाला नकार देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे.
- महाराष्ट्राच्या अपमानाची परंपरा नरेंद्र मोदी कायम ठेवू पाहत आहेत काय?
- “पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसताना देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले असून पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत असताना अजितदादा पवार यांच्या देहू येथील भाषणाला पंतप्रधान कार्यालयाचा नकार हे राजकारण राज्यातील भाजपाच्या सांगण्यावरून झाले असा माझा स्पष्ट आरोप आहे.
- याबाबत पंतप्रधान कार्यालयाने आपली भूमिका जाहीर करावी.
पंतप्रधानांच्या सभेत बोलू न देणे हे जाणिवपूर्वक घडलेले दिसते, सचिन सावंत
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधानांच्या सभेत बोलू न देणे हे जाणिवपूर्वक घडले आहे, असे दिसते.
- गतवेळेस दादांनी पंतप्रधानांसमोर राज्यातील महत्वाच्या व्यक्तीची शिवराय व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील वक्तव्ये निदर्शनास आणली होती.
- त्याचाच राग निघालेला दिसत आहे
कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
- देहू येथे आयोजित करण्यात आलेल्या शिळा लोकार्पणाच्या कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले हे उपस्थित होते.
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले.
- ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं.
- पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही.
- त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं.