Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आष्टी योजनेचे विस्तारीकरणातून मोहोळच्या ९ गावांना पाण्याची व्यवस्था करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

June 2, 2022
in सरकारी बातम्या
0
Ajit pawar

मुक्तपीठ टीम

आष्टी उपसासिंचन योजनेचे  विस्तारीकरण करून याद्वारे मोहोळ तालुक्यातील ९ गावांना शेतीसाठी  पाण्याची  व्यवस्था करण्यासाठी मंजूरी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले. तसेच भोगावती  खोऱ्यात पर्जन्यमान कमी असल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, बार्शी,  उत्तर सोलापूर तालुक्याच्या  भोगावती  नदीकाठच्या क्षेत्रातील भाग सिंचनाखाली  येण्यासाठी  सीना नदीवरून भोगावती नदीचे पुनर्भरण करणे, सीना-भोगावती जोडकालव्याद्वारे जोडून भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी सोडून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.            

सोलापूर जिल्ह्यातील सीना-भोगावती आणि आष्टी उपसा सिंचन योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रालयात बैठक झाली. यावेळी  आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाच्या सचिव शैला ए, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत हे उपस्थित होते. तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, मुख्य अभियंता ए टी धुमाळ तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.            

आष्टी उपसासिंचन योजनेतून मोहोळ तालुक्यातील ९ गावांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी आहे. येवती गावाजवळील तलावातून येवती तलावाच्या कालव्यातून व उजनी (भीमा)च्या डाव्या कालव्यातून येवती तलावात पाणी घेऊन १.५५ अघफू पाणी आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील १५ गावे, माढा तालुक्यातील २ गावातील क्षेत्रावर योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, नालबंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाची वाडी, अनगर  या ९ गावांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी आहे. या योजनेस ०.५८ अघफू पाणी उपलब्ध झाल्यानंतर या गावांतील ४५९० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. भोगावती  खोऱ्यात पर्जन्यमान कमी असल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्याच्या भोगावती नदीकाठच्या क्षेत्रातील भाग सिंचनाखाली  येण्यासाठी सीना नदीवरून भोगावती नदीचे पुनर्भरण करणे, सीना-भोगावती जोडकालव्याद्वारे जोडून पाणी भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये सोडून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी देण्यासंदर्भात बार्शी व मोहोळ तालुक्यातून मागणी आहे. बार्शी तालुका हा अवर्शणप्रवण क्षेत्रात येत असल्याने भोगावती  नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणे आवश्यक असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.  


Tags: ajit pawarAshti YojanaMoholWaterउपमुख्यमंत्री अजित पवारमोहोळ
Previous Post

सायबर गुन्हेगारीविरोधात सर्वंकष धोरण तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलांचे निर्देश

Next Post

#मुक्तपीठ #Live “भाजपा महिला नेत्याचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल! कारवाई का नाही?”

Next Post
#मुक्तपीठ #Live   “भाजपा महिला नेत्याचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल! कारवाई का नाही?”

#मुक्तपीठ #Live "भाजपा महिला नेत्याचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल! कारवाई का नाही?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!