Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अजित पवारांची जबरदस्त फटकेबाजी: शिंदेंचं मुख्यमंत्रीपद, चंद्रकांतदादांचं मंत्रीपद आणि जावई अध्यक्षांकडे हट्ट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ajit pawar On rahul narwekar

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कालच कोरोनामुक्त झालेत आणि आज त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर तुफानी फटकेबाजी केली. अध्यक्षांचं अभिनंदन करतानाच त्यांचे जावईहट्ट पुरवले, आता त्यांनी सासरचे हट्ट पुरवावे, असं बजावलं. जर शिंदेंनी कानात सांगितलं असतं तर आम्हीच त्यांना मुख्यमंत्री केलं असतं, असा चिमटा त्यांना काढत फडणवीसांच्याजागी शिंदे मुख्यमंत्री होण्यावरही त्यांनी भाजपाला चिमटा काढला. चंद्रकांतदादांच्या मंत्रिपदावरच प्रश्न निर्माण करत त्यांनी धाकधूक वाढवली.

अजित पवारांची तुफान फटकेबाजी त्यांच्याच शब्दात…

…शिदेंना आम्हीच मुख्यमंत्री केलं असतं!

  • एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असतं की अडीच वर्ष झालीत, आता मला तिथं बसायचंय.
  • तर मीच उद्धवजींशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं, तरी आम्ही तुम्हाला तिथं बसवलं असतं.
  • काही प्रॉब्लेम झाला नसता.
  • आदित्य, नसता आला ना प्रॉब्लेम?

मला मूळ भाजपवाल्यांचं वाईट वाटतं!

  • मी जेव्हा समोरच्या बाजूला पाहतो तर मूळ भाजपवाले कमी दिसतात.
  • आमच्याकडची लोकं जास्त दिसतात.
  • मला मूळ भाजपवाल्यांचं वाईट वाटतं.
  • पहिली लाईन पाहिली तरी लक्षात येईल.
  • गणेश नाईक, उदय सामंत, बबन पाचपुते, रादाकृष्ण विखे पाटील हे पहिल्या लाईनमध्ये आहेत.
  • आमच्याकडून गेलेले दीपक केसरकर तर आज एकदम भारी प्रवक्ते झाले आहेत, आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही हे दिसतंय.

शिवसेनेतून गेलेले किती मंत्री होतील?

  • देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करताच पिनड्रॉप सायलेन्स होता.
  • भाजपची काही मंडळी रडायला लागली.
  • गिरीश महाजनांचं रडणं बंद होईना.
  • फेटा बांधायला दिला तर डोळ्याचं पाणी पुसायला वापराया लागले. भाजपच्या आमदारांनी सांगावं की खरंच झालं ते कसं झालं?
  • हे जे घडलंय त्यानं समाधान झालंय का हे सांगावं!
  • चंद्रकांत दादा पाटील तुम्ही बेंच वाजवू नका, तुम्हालाच मंत्रीपद मिळत की नाही, धाकधूक आहे!
  • शिवसेनेतून गेलेल्यांपैकी किती जणांना मंत्रीपद मिळेल माहिती नाही.

नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात!

  • राहुल नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात.
  • शिवसेनेत गेल्यावर आदित्य ठाकरे यांना आपलंसं केलं. आमच्याकडे आल्यावर मला आपलंसं केलं.
  • भाजपमध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना आपलंसं केलं.
  • आता एकनाथ शिंदे तुम्ही यांना आपलंसं करा नाही तर काही खरं नाही!

आता जावयाने आमचे हट्ट पुरवावे!

  • राहुल नार्वेकर आमचे जावई आहेत.
  • आतापर्यंत आम्ही जावयाचे हट्ट पुरा पुरवायचो.
  • आता त्यांनी आमचा हट्ट पुरवला पाहिजे.
  • जावयांनी सासरचा हट्ट पुरवला पाहिजे.

Tags: ajit pawarmaharashtra assemblyRahul Narvekarअजित पवारविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
Previous Post

बंडखोर आमदार नैतिक चाचणीत नापास! – आदित्य ठाकरे

Next Post

#मुक्तपीठ #LiVE महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांचा विजय!

Next Post
#मुक्तपीठ #LiVE   महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांचा विजय!

#मुक्तपीठ #LiVE महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांचा विजय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!