मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कालच कोरोनामुक्त झालेत आणि आज त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर तुफानी फटकेबाजी केली. अध्यक्षांचं अभिनंदन करतानाच त्यांचे जावईहट्ट पुरवले, आता त्यांनी सासरचे हट्ट पुरवावे, असं बजावलं. जर शिंदेंनी कानात सांगितलं असतं तर आम्हीच त्यांना मुख्यमंत्री केलं असतं, असा चिमटा त्यांना काढत फडणवीसांच्याजागी शिंदे मुख्यमंत्री होण्यावरही त्यांनी भाजपाला चिमटा काढला. चंद्रकांतदादांच्या मंत्रिपदावरच प्रश्न निर्माण करत त्यांनी धाकधूक वाढवली.
अजित पवारांची तुफान फटकेबाजी त्यांच्याच शब्दात…
…शिदेंना आम्हीच मुख्यमंत्री केलं असतं!
- एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असतं की अडीच वर्ष झालीत, आता मला तिथं बसायचंय.
- तर मीच उद्धवजींशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं, तरी आम्ही तुम्हाला तिथं बसवलं असतं.
- काही प्रॉब्लेम झाला नसता.
- आदित्य, नसता आला ना प्रॉब्लेम?
मला मूळ भाजपवाल्यांचं वाईट वाटतं!
- मी जेव्हा समोरच्या बाजूला पाहतो तर मूळ भाजपवाले कमी दिसतात.
- आमच्याकडची लोकं जास्त दिसतात.
- मला मूळ भाजपवाल्यांचं वाईट वाटतं.
- पहिली लाईन पाहिली तरी लक्षात येईल.
- गणेश नाईक, उदय सामंत, बबन पाचपुते, रादाकृष्ण विखे पाटील हे पहिल्या लाईनमध्ये आहेत.
- आमच्याकडून गेलेले दीपक केसरकर तर आज एकदम भारी प्रवक्ते झाले आहेत, आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही हे दिसतंय.
शिवसेनेतून गेलेले किती मंत्री होतील?
- देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करताच पिनड्रॉप सायलेन्स होता.
- भाजपची काही मंडळी रडायला लागली.
- गिरीश महाजनांचं रडणं बंद होईना.
- फेटा बांधायला दिला तर डोळ्याचं पाणी पुसायला वापराया लागले. भाजपच्या आमदारांनी सांगावं की खरंच झालं ते कसं झालं?
- हे जे घडलंय त्यानं समाधान झालंय का हे सांगावं!
- चंद्रकांत दादा पाटील तुम्ही बेंच वाजवू नका, तुम्हालाच मंत्रीपद मिळत की नाही, धाकधूक आहे!
- शिवसेनेतून गेलेल्यांपैकी किती जणांना मंत्रीपद मिळेल माहिती नाही.
नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात!
- राहुल नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात.
- शिवसेनेत गेल्यावर आदित्य ठाकरे यांना आपलंसं केलं. आमच्याकडे आल्यावर मला आपलंसं केलं.
- भाजपमध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना आपलंसं केलं.
- आता एकनाथ शिंदे तुम्ही यांना आपलंसं करा नाही तर काही खरं नाही!
आता जावयाने आमचे हट्ट पुरवावे!
- राहुल नार्वेकर आमचे जावई आहेत.
- आतापर्यंत आम्ही जावयाचे हट्ट पुरा पुरवायचो.
- आता त्यांनी आमचा हट्ट पुरवला पाहिजे.
- जावयांनी सासरचा हट्ट पुरवला पाहिजे.