मुक्तपीठ टीम
मंत्रालयाच्या वादावरून पत्रकार परिषद घेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांच्यावर निशाणा साधला होता. जय पवार यांचे कारनामे मी लवकरच उघड करणार आहे. तसेच तो तुरुंगात जाईल, असं खळबळजनक विधान त्यांनी केले होते. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून कोण काय बोलतं याला महत्त्व देण्याची गरज नाही. या देशात नियमांचे उल्लंघन कोण करत असेल तर त्यांना आळा घालण्यासाठी कायदे आहेत, असे म्हणाले.
अजित पवारांचा सोमय्यांवर पलटवार
- अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
- यावेळी त्यांना किरीट सोमय्यांच्या दाव्याबाबत विचारण्यात आलं.
- त्यावर अजित पवार म्हणाले की, कायदा सर्व श्रेष्ठ असतो.
- या देशात नियमाचे उल्लंघन कोण करत असेल तर कायदे आहेत.
- कायदे पाळले जात नसतील तर खपवून घेतलं जात नाही.
- पण काही लोकं नुसतंच केवळ विधानं करत असतात. काही चॅनेलने तर कोणत्या दिवशी काय विधाने केली हे दाखवलं आहे.
- त्यामुळे अशा लोकांना अधिक महत्त्व देण्याची गरज नाही.
- उद्या ते कुणाचंही नाव घेणार आणि तुम्ही प्रश्न विचाराल हे योग्य नाही.
- आम्हाला कुणाच्या कुटुंबीयांबाबत बोलायचं नाही.
काय म्हणाले होते सोमय्या?
- किरीट सोमय्या यांनी मीडियाशी बोलताना मोठा बॉम्बगोळा टाकला होता.
- अजित पवारांची एक हजार ५५ कोटींची बेनामी संपत्ती जप्त झाली आहे.
- पुढे बघा काय होतं ते.
- अजित पवारांचा मुलगा जय अजित पवार याचे कारनामे उघड करणार आहे.
- तो जेलमध्ये जाणार, असा खळबळजनक दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.