Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांना दिले प्रत्युत्तर

January 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
ajit_pawar

मुक्तपीठ टीम

 

“मुंबई केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा” अशी  मागणी करणाऱ्या कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल’, असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबाराला उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

 

तर “कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे वाटावे म्हणून त्यांनी अशा प्रकारचे विधान केले आहे. त्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्षच करायला हवे”, असेही अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 

बेळगाव आणि आसपासच्या मराठी गावांविषयी बोलताना अजित पवार यांनी “ज्या गावांचा वाद आहे, तो मिटेपर्यंत तो भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत सुचवले आहे. त्याचा मुंबईशी काही संबंध नाही. त्या भागात अनेक वर्षे मराठी आमदार, महापौर, नगरसेवक निवडून येत होते. नंतर तिथल्या मतदारसंघांची फेररचना केली. मराठी भाषिकांच्या गावांमध्ये इतर जास्त संख्येची कानडी गावे जोडली गेली आणि त्यातून मराठी आमदारांचे मतदारसंघ फोडले गेले. हा त्यांचाच भाग असल्याचे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन राज्यांबाबतच्या अशा वादामध्ये केंद्राने मध्यस्थी करून मार्ग काढायचा असतो” अशी अपेक्षाही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

 

मेट्रो प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही

 

मेट्रो प्रकल्पाबाबत दर महिन्याचा आढावा मुख्यमंत्र्यांसोबत घेतला जातो. या चर्चेत सर्व संबंधित अधिकारी उपस्थित असतात. राज्यात सुरु असलेल्या सर्व मेट्रो प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

 

हा राज्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे. ज्याचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्वीट करावे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु सर्व मेट्रो प्रकल्पांच्या कामात कोणतीही दिरंगाई होत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने हे प्रकल्प फार महत्त्वपूर्ण असतात. आम्ही राज्य मंत्रिमंडळात काम करत असल्याने याची जाणीव आम्हाला आहे. यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शरद पवारसाहेब वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.


Tags: BelgaumDeputy Chief Minister Ajit Pawarउपमुख्यमंत्री अजित पवारकर्नाटक उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी
Previous Post

“आयएसआयचा माजी प्रमुखच भारताचा एजंट!” पाकिस्तानला आता झाला साक्षात्कार!!

Next Post

“शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील”- अशोक चव्हाण

Next Post
ashok

“शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील”- अशोक चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!