मुक्तपीठ टीम
पेपरफुटीप्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आक्रमक झाले आहेत. कोण सुपे? त्याच्याकडे नोटा सापडत आहेत. कुणीही असो. त्याचे धागेदोरे कुठेही जाऊदे. त्यांच्यावर कारवाई होणारच. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कुणाला नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
अजित पवारांची कठोर भूमिका
- महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
- यावेळी अजित पवार यांनी पेपरफुटी प्रकरणावर भाष्य केले.
- आपल्यात काही अधिकाऱ्यांना जास्त अधिकार दिले आहेत. त्याचा ते गैरफायदा घेतात.
- आता ते सुपेंचं ताज ताज उदाहरण आहे.
- कोण सुपे? त्याच्याकडे नोटा सापडत आहेत.
- कुणीही असो. त्याचे धागेदोरे कुठेही जाऊदे.
- त्यांच्यावर कारवाई होणारच.
- विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कुणाला नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने
- पुणे पोलीस आयुक्तांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे.
- ते याच्या मुळापर्यंत जातील याची आम्हाला खात्री आहे.
- हे प्रकरण समाजाला अडचणीत आणणारे आणि घातक आहे.
- असं पुन्हा घडू नये. यात राजकारण आणू नये.
- सीबीआयला भरपूर कामं आहेत.
- आपले पोलीस सक्षमपणे काम करत आहेत.
- याआधीही आपण सीबीआयला खूप प्रकरणे सोपवली.
- सुशांत सिंग प्रकरणात काय झालं? शेवटी आत्महत्या आहे हेच पुढं आलं.
- उगाच आभास करू नये.
- आपली पोलीस यंत्रणा कमी पडली तर दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची की नाही हे पाहू, असं त्यांनी सांगितलं.
सारथीच्या इमारतीचे काम लवकरच सुरू
- शहाण्यांना अधिक शहाणं करण्यासाठी ही संस्था काम करणार
- यशदा या संस्थेमार्फत या आधी प्रशिक्षण दिले जात आहे.
- नवीन नवीन गोष्ट देण्याकरिता राज्य सरकारने पुढे राहिले पाहिजे.
- सारथीच्या इमारतीचे काम लवकरच सुरू करायचे आहे.
- मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यावर त्याचे भूमीपूजन केले जाणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
शिक्षकांनी नवा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे
- काळ बदलला आहे.
- विद्यार्थी बदलले आहेत.
- त्यामुळे शिक्षकांनी बदलले पाहिजे.
- आजचे विद्यार्थी शिक्षकांपेक्षा हुशार झाले आहेत.
- इंटरनेटमुळे जगाशी जोडले गेले आहेत.
- इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काय माहिती मिळते यासंदर्भात आजचे विद्यार्थी जागृत आहेत.
- शिक्षकांनी नवा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, त्यासाठी ही संस्था सुरू करण्याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं.