मुक्तपीठ टीम
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महिला दिनाच्या शुभेच्छा देत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात केली. महाविकास आघाडी सरकारकडून आज सोमवारी विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यांनी विधिमंडळात दुपारी दोन वाजता बजेटचे वाचन सुरु केले. राज्यातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे.
महिलांसाठी
राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा
घर खरेदी करताना महिलांच्या नावे नोंदी केल्यास मुद्रांक शुल्कातील प्रचलित दरात १ टक्का सवलत
शाळेत येण्या-जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास
केंद्राकडून महिला व बालविकास विभागासाठी १३९८ कोटी
संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा, २५० कोटींचे बीज भांडवल
घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना
महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी महिला विशेष बस उपलब्ध करून देणार