Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार: अजित पवार

July 30, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ajit pawar

मुक्तपीठ टीम

पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. ‘मेट्रो’ मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.

पुणे मेट्रोने उर्वरीत काम जलद गतीने पूर्ण करावे, कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी सात वाजता केले.

pune

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे उपस्थित होते.

 

अत्याधुनिक, आरामदायी प्रवासाचे जलद व वेळेवर पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करणारी ट्रायल रन ठरणार असल्याचे सांगून उपुमख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना निर्धारीत वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेसोबतच पुणेकरांचे वेळेचे गणित जुळवून आणणाऱ्या वाहतूक आधुनिक व्यवस्थेची ही ट्रायल रन आहे. या ट्रायल रनच्या निमित्ताने पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. महामेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरात सुरु असणारे मेट्रो रेल्वेंचे काम निर्णायक टप्प्यावर आहे. लॉकडाऊनच्या काळातही काम सुरु होते. ६० टक्के काम आजच्या घडीला पूर्ण झाले आहे. अत्यंत वेगाने, विश्वासाने, निर्धाराने,कोणताही अपघात न होता, हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यात महामेट्रोच्या, पुणे मेट्रोच्या सर्व इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी बांधवांची मोठी मेहनत असल्याचे गौरवोद्गारही काढले.

 

पुणे मेट्रोची सगळ्या मार्गांची कामे पूर्ण होऊन, ही मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर, सायकल, मोटरसायकल, दुचाकीचे शहर अशी ओळख असणारं पुणे शहर, हे मेट्रो वाहतुकीचे शहर म्हणून ओळखलं जाईल. पुणे मेट्रोमुळे रस्त्यावरचा वाहनांचा, वाहतुकीचा, प्रदुषणाचा ताण कमी होईल. वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल. पुणेकर त्यांच्या निर्धारित ठिकाणी, निर्धारीत वेळेत पोहोचू शकतील, दुसऱ्याला दिलेली वेळ आणि वेळेचं गणित, पुणेकर भविष्यात पाळू शकतील असा विश्वास व्यक्त करतानाच मेट्रो रेल्वेसेवा ही प्रदुषणविरहीत सेवा असल्याने प्रदुषण होणार नाही. रस्त्यांवरची वाहने कमी झाल्याने, त्या माध्यमातून होणारे प्रदुषणही कमी होईल. पुणे शहर आणि परिसरातली वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुण्याभोवती रिंग रोड करण्यात येणार आहे. वाहतुकीची समस्या हीच पुणे शहाराची प्रमुख समस्या आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून ती काही प्रमाणात निश्चितच सुटेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

pune

कोणत्याही परिस्थितीत पुणे मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रो पुणे शहरातून ३३.२० किलोमीटर अंतर धावणार आहे. या मेट्रोलाईनवर ३० मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या एकूण लांबीपैकी २७.२८ किलोमीटर मेट्रो रस्त्याच्या समांतर पूलावरुन धावणार आहे. तर पुण्याच्या खालून बोगद्यातून ६ किलोमीटर मेट्रो धावणार आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोच एकूण काम जवळपास ६० टक्के पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोने उर्वरीत काम जलद गतीने पूर्ण करावे, असे निर्देशही दिले.

 

पीएमआरडीए विकास आराखड्याचे प्रारूप मान्य

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगर विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीच्या बैठकीत, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिध्दीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे पुण्याला, सर्वोत्तम महानगर विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. या विकास आराखड्यात २ रिंगरोड, हायस्पीड रेल्वे व क्रिसेंट रेल्वे, १० मेट्रो मार्गिका, १३ मल्टी मॉडेल हब, ४ प्रादेशिक केंद्रे, १५ नागरी केंद्रे, १२ लॉजिस्टिक केंद्रे, ५ पर्यटन स्थळ व ३ सर्किट्स, ५ शैक्षणिक केंद्रे, २ वैद्यकीय संशोधन केंद्रे व ७ अपघात उपचार केंद्रे, जैव विविधता उद्यान, कृषी प्रक्रिया संशोधन व विकास केंद्रे, १ क्रिडा विद्यापीठ, ८ ग्रामीण सबलीकरण केंद्रे, ५९ सार्वजनिक गृह प्रकल्प, २६ नगर रचना योजना, ४ कृषि उत्पन्न बाजार केंद्रे, ५ प्रादेशिक उद्याने, ८ जैव विविधता उद्याने व १६ नागरी उद्याने, ४ अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे, ३० अग्निशमन केंद्रे, २ औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र, १ व्यवसाय केंद्र असे महत्वाचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र ६ हजार ९१५ चौ.कि.मी. असून हे क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र असल्याचा उल्लेखही केला.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुणे मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास सुलभ व सुरक्षित होणार आहे, आयटीचे क्षेत्र म्हणून पुणे शहर प्रभाव वाढवते आहे, त्यात मेट्रोची भर पडणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरेल, दिल्ली, नागपूरकरांचा मेट्रोचा अनुभव चांगला आहे, आता हाच अनुभव पुणेकराना अनुभवण्यास मिळणार असल्याचा उल्लेख केला.

pune

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरात मेट्रो ट्रायल रन हा ऐतिहासिक क्षण आहे. केंद्र व राज्यशासनाने मेट्रोच्या कामाला गती दिल्याने हा क्षण आज अनुभवता आला. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार करता आजच्या मेट्रो ट्रायल रनचे महत्व असल्याचे सांगितले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरात मेट्रो ट्रायल रन हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत मेट्रोचे सर्व मार्ग सुरू होतील, त्यामुळे पर्यावरणास मदत होईल सोबतच वाहतूक कोंडीला पर्याय असेल, असे सांगितले.

प्रास्ताविक महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले. यावेळी कोरोनाचे निर्बंधाचे पालन करून मेट्रोचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे मेट्रो रेल प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

१. देशातील सर्वात हलके मेट्रो कोच

  • कमी वजनाच्याअ‍ॅल्युमिनियम बॉडीसह बनलेले.
  • डिझाइन गती ९५ किमी प्रतितास.
  • प्रवासी क्षमता ९७५ पॅक्स / ३ कार ट्रेन (६ कारसाठी विस्तारित करण्याची क्षमता)

२. सुरवातीपासून सौर ऊर्जेचे एकत्रीकरण

  • ११.१९ मेगावॅटएकूण सौर उर्जा स्थापित करण्याची योजना.
  • त्यामुळं प्रति वर्षी २० कोटींची बचत.
  • दर वर्षी अंदाजे २५ हजार टन कार्बनडायऑक्साईड उत्सर्जनापासून सुटका.

३. नावीन्यपूर्ण यूजी स्टेशनची रचना: एनएटीएम (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड)

  • दोन मेट्रो स्थानके: मंडई व बुधवारपेठ मेट्रो स्थानकांना या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधणार.
  • या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं जागेची बचत झाली.
  • शहरातील सुमारे २०० रहिवाशांचे पुनर्वसन टाळले.

 

४.‘कचरे से कांचन तक’डम्पिंग साइटचे डेपोमध्ये रूपांतर :

  • कोथरूड कचरा डम्पिंग साइट १२.२ हेक्टर क्षेत्रामध्ये पसरली आहे.
  • ३लाख ८० हजार घनमीटर कचरा असणाऱ्या या जागेची रुपांतर सुंदर परिसरात होणार.

५ . कार्यक्षम पाणी व्यवस्थापन 

  • सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करण्यासाठी ‘अनॅरोबिक बायोडायजेस्टर तंत्रज्ञाना’चा वापर करण्यासाठी ‘डीआरडीओ’सोबत सामंजस्य करार.
  • बहुतांश स्थानकांमधून मनपाच्या गटारलाईनमध्ये सांडपाणी सोडण्यात येणार नाही.
  • प्रत्येक स्टेशनवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणार.

 

६ . वृक्षारोपण आणि पुनर्रोपण :

  • शक्यतो झाडे तोडायची नाहीत ही महामेट्रोची पॉलिसी आहे, नाईलाजाने झाडेकाढण्याची वेळ आल्यास ती न तोडता त्या झाडांच ‘रुट बॉल’ पध्दतीनं पुनर्रोपण करण्यात येते.
  • पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत १ हजार ६९८ झाडांचं पुनर्रोपण तर ११ हजार ६८३ नवीन झाडांची लागवड करण्यात आली.

 

७ . ‘पीपीपी’ तत्वावर पार्किंग कम कमर्शियल डेव्हलपमेंट नियोजित ठिकाण:

  • स्वारगेट मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब – २.१० दशलक्ष चौरस फुट क्षेत्र.
  • सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशन – १.०२ दशलक्ष चौरस फुट क्षेत्र.
  • रेंज हिल डेपो -२.०९ दशलक्ष चौरस फुट क्षेत्र.
  • हिल व्ह्यू कार पार्क डेपो, कोथरूड –१.८७ दशलक्ष चौरस फुट क्षेत्र.

Tags: chief minister uddhav thackerayDeputy Chief Minister Ajit PawarDr.Neelam GorheMetropuneउपमुख्यमंत्री अजित पवारचंद्रकांत पाटीलपीएमआरडीएपुणेपुणे महानगरपालिकामहापौर मुरलीधर मोहोळमेट्रो
Previous Post

केरळमधून उसळणार देशातील तिसरी कोरोना लाट?

Next Post

युवक राष्ट्रवादीच्या वतीने पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंची मदत

Next Post
NCP

युवक राष्ट्रवादीच्या वतीने पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!