मुक्तपीठ टीम
यंदा गुलाब चक्रीवादळामुळे कायम दुष्काळानं होरपळलेल्या मराठवाड्याला पावसानं झोडपलं. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेती आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं.सतत पडणाऱ्या पावसामळे मराठवाड्यातील काढणीला आलेली सर्व पिकं उद्धवस्त झाली आहेत.रस्त्यांची, पुलांची, शेतीची वाईट अवस्था दिसत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. नडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान ४ हजार कोटी रुपयांचे असावे, असं सांगितलं आहे.
अजित पवारांचं आश्वासन
- मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टर क्षैत्रापैकी ३५ ते ३६ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.
- एनडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान ४ हजार कोटी रुपयांचे झाले असावे.
- पालकमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
- ओल्या दुष्काळाचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावर होईल.
- मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहे.
- वेळप्रसंगी कर्ज काढू.
- पण मराठवाड्याच्या आणि राज्यातील कुठल्याच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण
- बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय.
- १९ तारखेपर्यंत अजून पावसाचा अंदाज आहे.
- एनडीआरएफच्या नॉर्मनुसार काम सुरु आहे.
- मुखमंत्र्यांना सोमवारी याबाबत आम्ही अहवाल देणार आहेत.
- तसेच नुकसानीविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.
Flood in marathwada. @CMOMaharashtra please help farmers to come out from this situation #flood #Marathwada pic.twitter.com/R2aJMYJdP4
— Munde Rushikesh (@Munderushi11) September 29, 2021
निकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री स्तरावर निर्णय
- रस्ते पूल सगळं वाहून गेलं.
- तलाव फुटले आहेत.
- नुकसानीचा पूर्ण अंदाज अजून आलेला नाही.
- मात्र, यंत्रणा काम करत आहे.
- यापूर्वी पीक विम्याचे पैसे आम्ही सोडलेले आहेत.
- आता केंद्रानेही पैसे द्यावेत.
- नुकसान झालेले शेतकरी तसेच इतर घटकांना मदत करण्यासंदर्भात पॅकेज जाहीर करण्याबाबत आम्ही चर्चा करणार आहेत.
- यावर मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल.