Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार”: अजित पवार

August 25, 2021
in सरकारी बातम्या
0
ajit pawar

मुक्तपीठ टीम

कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीचा क्रीडाप्रकार आहे. कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, त्याचा प्रसार-प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी आसोसिएशनच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन, उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

 

अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन-महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन किर्तीकर, उपाध्यक्ष दिनकर पाटील, शशिकांत गाडे, सहकार्यवाह ॲड आस्वाद पाटील, कोषाध्यक्ष मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र देसाई, विश्वास मोरे, सच्चितानंद भोसले, मनोज पाटील यांच्यासह अन्य सदस्य ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. या संकटकाळात महाराष्ट्रातील सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे, त्यामुळे आपल्याला अधिक सतर्कपणे काम करण्याची गरज आहे. कबड्डी महर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खेळाला मोठ्या उंचीवर पोहोचवले. कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारा बदल आत्मसात करुन ते अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

यावेळी नियमित कामकाज पूर्ण करण्यात आले व पुढील विशेष सर्वसाधारण सभा २१ सप्टेंबर २०२१ सकाळी ११ वाजता मुंबई येथे घेण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

 


Tags: coronaDeputy Chief Minister Ajit Pawarउपमुख्यमंत्री अजित पवारमहाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन
Previous Post

माथेरान येथील पाणीपुरवठा देयकांकरिता अभय योजना लागू करण्याबाबत शासन सकारात्मक

Next Post

“पर्यावरणपूरक उद्योगास अनुदान देण्यासंदर्भात अभ्यास करणार”

Next Post
sanjay bansode

"पर्यावरणपूरक उद्योगास अनुदान देण्यासंदर्भात अभ्यास करणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!