Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“इलेक्ट्रीक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार”: उपमुख्यमंत्री अजित पवार

July 22, 2021
in सरकारी बातम्या
0
ajit pawar

मुक्तपीठ टीम

राज्यातील वाढते प्रदुषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रीक‍ गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

 

फिटवेल मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेडच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी- चिंचवड येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त राजेश पाटील, फिटवेल मोबिलीटी प्रा. लि.चे रवींद्र कंग्राळकर, चैतन्य शिरोळे, ए. शशांक, केदार, जगदीश कदम व कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, काळाची पावलं ओळखून भविष्याचा वेध घेऊन फिटवेल मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेडने इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाड्यांचे वितरण सेवा सुरु केली आहे. गेल्या काही वर्षापासून पिंपरी- चिंचवड एमआयडीसी ॲटो हब म्हणून ओळखली जाते. आता इलेक्ट्रीक वाहनांचे विक्री हब म्हणून नवीन ओळख पिंपरी -चिंचवड शहराला मिळेल. फिटवेल मोबिलीटीच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाडया या सर्व प्रकारच्या प्रदुषणापासून मुक्त असतील. प्रवासी व मालवाहतूक क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण होईल. पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर इलेक्ट्रीक मोटारी प्रवासी व मालवाहतूकीसाठी एक चांगला, माफक, स्वच्छ व प्रदुषणमुक्त, फायद्याचा पर्याय आहे.

या पुढच्या काळात इलेक्ट्रीक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देण्याचे भूमिका सरकारने घेतली आहे. राज्यातलं वाढतं प्रदुषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेता सरकारने नवीन इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रीक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. इलेक्ट्रीक वाहन खरेदीला प्राधान्य मिळावे यासाठी राज्यातील प्रमुख शहरामध्ये सरकारी व खाजगी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार आहेत. पेट्रोल, डिझेलचे वाढणारे दर त्यामुळे होणारे प्रदुषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रीक वाहने हाच पर्यावरण पुरक असा चांगला पर्याय असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फिटवेल मोबिलीटी कंपनी, मॅन-युनायटेड एचआर अँन्ड मार्केटींग कंपनी, चैतन्य सेल्स सर्विसेस कंपनी, इलेक्ट्रीक गाड्यांच्या उत्पादन, विक्री, देखभाल-दुरुस्तीच्या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या संबंधीतांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

 

 


Tags: air pollutionDeputy Chief Minister Ajit PawarE-vehicleइलेक्ट्रीक वाहनेउपमुख्यमंत्री अजित पवारफिटवेल मोबिलीटी कंपनी
Previous Post

“बरे झाले स्वामीच बोलले नाहीतर राष्ट्रद्रोह झाला असता”

Next Post

दिल्लीच्या ‘जंतर-मंतर’मध्ये ‘किसान संसद’, २०० शेतकरी सहभागी

Next Post
Farmers parliament

दिल्लीच्या ‘जंतर-मंतर’मध्ये 'किसान संसद', २०० शेतकरी सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!