Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नृसिंहवाडी येथील बहुमजली पार्किंग इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

May 15, 2022
in Uncategorized, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Ajit Pawar Inaugrated Multi Storey building At nursinhwadi

मुक्तपीठ टीम

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल निधीतून बांधण्यात आलेल्या बहुमजली पार्किंग इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

तीर्थक्षेत्र विकास विशेष कार्यक्रमांतर्गत नृसिंहवाडी येथे बांधण्यात आलेल्या पार्किंग इमारतीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, नृसिंहवाडीच्या सरपंच पार्वती कुंभार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

Ajit Pawar Inaugrated Multi Storey building At nursinhwadi

नृसिंहवाडी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता येथे बांधण्यात आलेल्या पार्किंग इमारतीमुळे पार्किंगची चांगली सोय होणार आहे. ६ कोटी ६३ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पार्किंग इमारतीमध्ये २७० वाहनांच्या पार्किंगची सोय होणार असल्याने भाविकांना याचा लाभ होईल.

तळमजला, पहिला मजला व टेरेसवर प्रत्येकी ९० अशा एकूण २७० चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. तळमजला व पहिल्या मजल्यावर १८० वाहनांचे बंदिस्त पार्किंग तर टेरेसवर ९० वाहनांचे ओपन पार्किंगची सोय केली आहे. या इमारतीत वाहन आत येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री दत्ताचे दर्शन दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्ताचे दर्शन घेतले. तसेच येथे सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेतली.


Tags: Deputy Chief Minister Ajit PawarNrusinhwadiउपमुख्यमंत्री अजित पवारनृसिंहवाडीबहुमजली पार्किंग इमारत
Previous Post

“काश्मीरी पंडितांच्या दुखाग्नीवर भाजपाने फक्त राजकीय पोळ्या भाजल्या” : सचिन सावंत

Next Post

केरळमध्ये मुलांना टोमॅटो फ्लूची लागण! जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि सुरक्षेचे उपाय…

Next Post
Tomato Flu

केरळमध्ये मुलांना टोमॅटो फ्लूची लागण! जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि सुरक्षेचे उपाय...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!