Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महाराष्ट्राची २४ हजार कोटींची जीएसटी भरपाई तातडीने मिळावी”

उपमुख्यमंत्री अजित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी

May 29, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ajit pawar

मुक्तपीठ टीम

देशातील सर्व राज्ये कोरोनाविरुद्ध निकराने लढत आहेत. ही लढाई आर्थिकदृष्ट्या सुसह्य होण्यासाठी कोरोनासंदर्भात उपयोगात येणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे, आरोग्यविषयक सेवा आदींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर अधिकाधिक सवलत देण्यात यावी. मेडीकल ग्रेड ऑक्सिजन, ऑक्सिजन ऑक्सिमीटर, पल्स ऑक्सिमीटर, कोरोना टेस्टींग किट्स आदी वस्तूंची ग्राहकांकडून परस्पर खरेदी होते. या वस्तुंनाही जीएसटी करात सवलत मिळावी. छोट्या करदात्यांसाठी विचारपूर्वक सुलभ करप्रणाली आणावी. गेल्या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला येणे असलेली २४ हजार कोटींची जीएसटी भरपाई त्वरीत मिळावी. कोरोनाकाळात लागू लॉकडाऊन परिस्थीतीमुळे राज्यांच्या आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन राज्यांना पुरेसी भरपाई मिळण्यासाठी संबंधित निकषांचा फेरविचार करावा. लॉकडाऊनमुळे झालेल्या महसुल हानी व आर्थिक दुष्प्रभावांचे निराकरण येत्या एक-दोन वर्षात होणे शक्य नसल्याने, महसूल संरक्षण आणि भरपाई यांचा कालावधी वर्ष २०२२-२३ ते वर्ष २०२६-२७ असा पुढील पाच वर्षांसाठी वाढविण्यात यावा, पेट्रोल, डिझेल सारख्या वस्तुंवरील विविध उपकर आणि अधिभारापोटी केंद्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. वर्ष २०२०-२१ मध्ये सुमारे ३.३० लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडे जमा झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यांचे हात बळकट करण्यासाठी या निधीचे राज्यांना सुयोग्यपणे वाटप करावे, आदी मागण्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या वतीने जीएसटी परिषदेत केल्या.

 

कोरोना संबंधित औषधांसह आवश्यक उपकरणे, साहित्यांवर कर सवलत

कोरोना प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच जिवितहानी टाळण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लसीकरण कार्यक्रम टप्प्या-टप्प्याने राबविला जात आहे. राज्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून त्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाचा यशस्वी सामना करण्यासाठी कोरोना संबंधित वस्तूंवर केंद्र सरकारच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या करांच्या बाबतीत दिलासा दिला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी कोरोनाशी संबंधीत वैद्यकीय आपुर्तींवरील करावर जास्तीत जास्त सवलत देण्यात यावी. त्यामुळे राज्य सरकारसह सामान्य नागरीकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. कोरोनाविरुध्द लढण्यासाठी सामान्य नागरीकांना आवश्यक असणाऱ्या मेडीकल ग्रेड ऑक्सिजन, ऑक्सिजन ऑक्सिमीटर, पल्स ऑक्सिमीटर, कोरोना टेस्टींग किट्सवरील करांमध्ये सवलत देण्यात यावी.

 

त्रैमासिक विवरणपत्र व त्रैमासिक कराचा भरणा

सध्या लहान करदाते मासिक कर भरणा करतात आणि त्रैमासिक विवरणपत्र दाखल करतात. ही पध्दत त्रैमासिक कर भरणा आणि त्रैमासिक परताव्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. कर प्रणाली लहान करदात्यांसाठी सुलभ करण्याची आवश्यकता आम्ही समजू शकतो. तथापि लहान करदात्यांपर्यत प्रस्तावित पध्दतीचा लाभ पोहचण्यासाठी यावर येणाऱ्या अभिप्रायांचा योग्यपणे अभ्यास करुन ही योजना राबविण्यात यावी. ज्यायोगे या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात यश मिळेल.

 

अनडिनेचर अल्कोहल

अनडिनेचर्ड अल्कोहोल हे वॅटअंतर्गत ठेवणे योग्य असून ते जीएसटी अंतर्गत घेण्यात येऊ नये.

 

जीएसटी कराची प्रलंबित भरपाई

सन २०२०-२१साठी महाराष्ट्र राज्यास जीएसटी कराची भरपाई देयता सुमारे रुपये ४६ हजार कोटी रुपयांची होती. आतापर्यंत राज्यास फक्त २२ हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाची सुमारे २४ हजार कोटींची भरपाई राज्यास मिळणे अद्याप प्रलंबित आहे. कोरोना महामारीच्या काळातील राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करुन उर्वरित नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी.

 

भरपाई गणन आधारात सुधारणा करावी

चालू आर्थिक वर्षात राज्य कोरोनाच्या परिस्थितीचा व त्यामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा सामना करत आहे. कार्यसूची-17 मध्ये, भरपाईची गणना करण्याऱ्या आधाराचे पुरर्परीक्षण करुन त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी. त्यामुळे राज्याला पुरेशी भरपाई मिळेल आणि सन २०२०-२१च्या प्रमाणे मोठी थकबाकी राहणार नाही.

 

महसूल हानीची भरपाईच्या कालावधीत वाढ करावी

कोरोना महामारीमुळे होणारे आर्थिक प्रभावांचे निराकरण एक -दोन वर्षात होऊ शकत नाही. त्यामुळे महसूल संरक्षण आणि भरपाई यांचा कालावधी आगामी पाच वर्षापर्यंत (सन 2022-23 ते सन 2026-27) वाढविण्यात यावा.

 

इंधनावरील उपकरासह अधिभारात राज्याला सुयोग्य वाटा मिळावा

पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनावर आकारण्यात येणाऱ्या विविध उपकर वअधिभारातून गोळा केलेली रक्कम केवळ भारत सरकारला उपलब्ध आहे. (सन २०२०-२१ मध्ये अंदाजे ३.३० लाख कोटी रुपये) कोरोना महामारीच्या विरुध्द लढा देण्यासाठी राज्यांसोबत या रकमेचे सुयोग्यपणे वाटप करण्यात यावे.


Tags: coronaDeputy Chief Minister Ajit Pawarउपमुख्यमंत्री अजित पवारजीएसटी
Previous Post

“मराठा आरक्षणाची हुकूमाची पानं मोदींच्या हातात, तर तुमची गरजच काय?”

Next Post

लिंगबदलानंतर नवे नाव, लिंगाचा उल्लेख असलेला पासपोर्ट नाही, न्यायालयात सुनावणी

Next Post
Delhi

लिंगबदलानंतर नवे नाव, लिंगाचा उल्लेख असलेला पासपोर्ट नाही, न्यायालयात सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!