Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संगीत क्षेत्रातील आयडॉल ‘इंडियन आयडॉल’ मराठीसोबत!

आता अजय-अतुल ‘इंडियन आयडॉल’ मराठीचे परीक्षक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajay-atul

मुक्तपीठ टीम

काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मराठीतही ‘इंडियन आयडॉल’ हा कार्यक्रम सुरू होणार असल्याची चर्चा सुरू होती. सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘इंडियन आयडॉल’ मराठीचे परीक्षक कोण असणार याचे उत्तर प्रेक्षकांना मिळाले आहे. संगीत क्षेत्रातील सुप्रसिध्द जोडी म्हणजेच अजय अतुल या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. त्यांच्या निवडीमुळे संगीत क्षेत्रातील आयडॉल ‘इंडियन आयडॉल’ मराठीसोबत आल्यानं कार्यक्रम नक्कीच नवी उंची गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात. मग मोठमोठ्या कलाकारांचे टीव्हीकडे पुनरागमन असो किंवा वेगवेगळ्या विषयांचे रिऍलिटी शोचे मराठीत आगमन असो, यातून मराठी चॅनेल मनोरंजनामध्ये अधिक व्यापक होत असल्याचे चित्र दिसून येते. बऱ्याच वेळा लोकल टू ग्लोबल लोकप्रिय कार्यक्रमांच्या मराठी आवृत्त्याही प्रदर्शित केल्या जातात. त्यांपैकीच एक कार्यक्रम म्हणजे ‘इंडियन आयडॉल’! ‘इंडियन आयडॉल’ भारतातही लोकप्रिय कार्यक्रम आहे. हिंदीमध्ये त्याचे १२ सीजन झाले आहेत. या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहता हाच प्रयोग आता मराठीतही करण्यात येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच ‘इंडियन आयडॉल’ मराठी हा कार्यक्रम सुरु होणार आहे.

 

अजय-अतुल घेऊन येत आहेत मराठीतला ग्रँड रियालिटी शो, ‘इंडियन आयडल मराठी’!
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!
‘इंडियन आयडल मराठी’ आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. #इंडियनआयडलमराठी | #IndianIdolMarathi#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati @AjayAtulOnline pic.twitter.com/349p3RmN11

— Sony मराठी (@sonymarathitv) October 1, 2021

 

भव्य वॉलपेंटिंगद्वारे घोषणा

  • ‘इंडियन आयडॉल’ मराठीचे परीक्षण कोन करणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना होती.
  • सोनी मराठी कडून भव्य वॉलपेंटिंगद्वारे याबाबत घोषणा करण्यात आली.
  • सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत.
  • अजय अतुल यांचा फोटो असलेल्या भव्य वॉलपेंटिंग द्वारे सोनीकडून परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे.
  • हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ‘इंडियन आयडॉल’ हा कार्यक्रम लोकप्रिय आहे.
  • ‘इंडियन आयडॉल’चा मराठीमधील हा पाहिलाच प्रयोग आहे.
  • हिंदी प्रमाणेच ‘इंडियन आयडॉल’ मराठीला देखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

 

ajay-atul

‘इंडियन आयडॉल’च्या मराठीतील या प्रयोगास प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे. लोकप्रिय परीक्षकांसोबत महाराष्ट्रातील टॅलेंटचा आस्वाद या कार्यक्रमातून घेता येणार आहे. अजय अतुल ही संगीतकारांची जोडी प्रथमच रिऍलिटी शोमध्ये परीक्षण करणार आहेत.

 

अजय अतुल यांचे लोकप्रिय संगीत

  • जोगवा (मराठी)
  • नटरंग (मराठी)
  • सैराट (मराठी)
  • अग बाई अरेच्चा (मराठी)
  • लय भारी (मराठी)
  • अग्निपथ (हिंदी)
  • सिंघम (हिंदी)
  • तुंबाड (हिंदी)

 

सैराट हा चित्रपट जितका लोकप्रिय आहे, तितकेच लोकप्रिय त्याचे संगीतदेखील आहे. अजय अतुल यांनी सैराटच्या संगीतासोबत मराठीतला पहिला आणि अभिमानास्पद प्रयोग केला. तो म्हणजे सैराट मधील ‘याड लागलं’ या गाण्याची सिंफनी लॉस अँजलस येथे रेकॉर्ड करण्यात आली आहे. सैराटच्या निमित्ताने पहिल्यांदा एका भारतीय चित्रपटाच्या गाण्याचे सिंफनी ऑर्केस्ट्रा हॉलीवूड येथे रेकॉर्डिंग झाले. या दिवसासाठी ३० वर्ष वाट पहावी लागली असे अजय अतुल यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. एका मराठी चित्रपटासाठी हे घडून येणे अत्यंत अभिमानाची गोष्ट मानली गेली. अजय-अतुल यांचे सैराट प्रमाणेच मराठीतील इतरही अनेक अल्बम लोकप्रिय आहेत. जोगवा या मराठी चित्रपटाच्या संगीतासाठी अजय-अतुल यांना नॅशनल अवॉर्ड मिळाले आहे. मराठी सोबतच त्यांनी हिंदी मध्ये देखील अनेक चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. अशा या लोकप्रिय आणि हरहुन्नरी गायकांच्या जोडीचे परीक्षण ‘इंडियन आयडॉल’ मराठी मध्ये पाहायला मिळणार आहे, प्रेक्षकांसाठी ही मेजवानी असणार आहे.


Tags: Ajay-atulsony marathiअजय-अतुलइंडियन आयडॉल मराठीसोनी मराठी
Previous Post

रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतून ‘नोबेल’ मिळविणारे वैज्ञानिक घडावेत!

Next Post

संदीप काळे यांचे ‘ऑल इज वेल’ राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित

Next Post
All is well Book Publications

संदीप काळे यांचे ‘ऑल इज वेल’ राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!