मुक्तपीठ टीम
५जी स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर भारती एअरटेलने मोठी घोषणा केली आहे. भारती एअरटेलने सांगितले की, आत ते ही ऑगस्ट २०२२मध्ये देशात ५जी सेवा सुरू करणार आहे. याविषयीची अधिकृत घोषणा करताना, भारती एअरटेलने सांगितले की, देशात ५जी लाँच करण्यासाठी कंपनीने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबतही भागीदारी केली आहे.
भारती एअरटेलची नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत भागीदारी
१. सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेलने नुकत्याच झालेल्या ५जी स्पेक्ट्रम लिलावात एकूण 19867Mhz स्पेक्ट्रम 900Mhz, 1800Mhz, 2100Mhz, 3300Mhz आणि 26Ghz बँडमध्ये खरेदी केले आहेत. २. एअरटेलने आपल्या घोषणेमध्ये म्हटले आहे की, कनेक्टिव्हिटी आणि संपूर्ण भारत सेवांसाठी एरिक्सन आणि नोकियासोबत दीर्घकाळ टाय-अप आहे, तर सॅमसंगशी टाय-अप या वर्षापासूनच सुरू होईल.
रिलायन्स जियोचा ५जी स्पेक्ट्रममध्ये सर्वाधिक वाटा!
१. देशातील तीन कंपन्यांनी सर्वाधिक ५जी स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत.
२. अदानी डेटा नेटवर्क ही नवीन कंपनी म्हणून रुजू झाली आहे.
३. देशात ५जीसाठी एकूण १ लाख ५० हजार १७३ कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात आला आहे.
४. या लिलावात एकट्या रिलायन्स जियोने ८८ हजार ०७८ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत, म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक स्पेक्ट्रम जियोच्या ताब्यात आहे.
५. तर भारती एअरटेलने १९ हजार ८६७ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम आणि व्होडाफोन-आयडियाने ६ हजार २२८ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत.
एअरटेलपूर्वी, रिलायन्स जियो इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी आम्ही ५जी लाँच करून आझादीचा अमृत महोत्सव साजरा करू, असे सांगितले होते.