Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एमएडीसी आणि एमआयडीसीमार्फत विमानतळांचा विकास करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 25, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Airport Development

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (MADC) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्यामार्फत संयुक्तिकरित्या विमानतळांचा विकास करावा. पुरंदर विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने तातडीने जागेचे अधिग्रहण करावे; याचबरोबर अमरावती बेलोरा विमानतळांवर रात्री विमान उतरण्याची सुविधा तत्काळ सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज्यातील विविध विमानतळांच्या कामकाजासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे एमएडीसी, उद्योग व नगरविकास विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, पायाभूत सुविधा वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, नगरविकास विभागाच्या सहसचिव प्रतिभा भदाणे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुरंदर विमानतळासंदर्भात तालुक्यातील परवानगी प्राप्त जागा निश्चित करुन तातडीने त्याचे अधिग्रहण करावे. शिर्डी विमानतळाचा प्रमुख विमानतळात समावेश झाल्याने केंद्र सरकारकडून विकासासाठी निधी प्राप्त होणार आहे. ३५० कोटी रूपये खर्च करून या विमानतळाचा विस्तार करावा, तसेच प्रवासी सुविधा तत्काळ निर्माण करावी, असेही ते म्हणाले. याचबरोबर, रत्नागिरी, चंद्रपूर, सोलापूर, धुळे, कराड, गोंदिया येथील विमानतळाच्या विकासासंदर्भातील कामे जलदगतीने करावी, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


Tags: Airport DevelopmentDeputy Chief Minister Devendra FadnavisMADCMIDCmuktpeethउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसएमआयडीसीएमएडीसीघडलं-बिघडलंमुक्तपीठविमानतळ विकाससरकारी बातमी
Previous Post

जे.जे. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मागण्या मार्गी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

Next Post
mpsc

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!