मुक्तपीठ टीम
अमेरिकेत 5G इंटरनेट सेवा लाँच झाल्यामुळे अमेरिकत विमान सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. इंटरनेटच्या भन्नाट वेगामुळे जगभरात आतुरता असलेल्या 5Gमुळे वेगळे काही धोके दिसू लागले आहेत. अमेरिकन एव्हिएशन रेग्युलेटर, फेAirlines cancelled some flights due to concern over 5Gडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एफएएच्या आक्षेपानुसार, 5G विमानाच्या रेडिओ अल्टिमीटर इंजिन आणि ब्रेक सिस्टममध्ये अडथळे आणू शकते, ज्यामुळे विमानाला धावपट्टीवर उतरण्यास समस्या येऊ शकतात. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांनंतर एमिराट्स, जपान आणि आता एअर इंडियानेही अमेरिकेतील आपली काही उड्डाणं रद्द करण्याचं पाऊल उचललं आहे.
एअर इंडिया व्यतिरिक्त, युनायटेड एअरलाइन्स आणि अमेरिकन एअरलाइन्स या दोन अन्य कंपन्या भारत आणि अमेरिका दरम्यान उड्डाण करतात. त्यांच्याही उड्डाणांवर परिणाम झाल्याने या दोन देशांमधीलच नाही तर अन्य देशांमधील विमान सेवांवरही दुष्परिणाम होणार आहे.
So far today, Air India, ANA, Japan Airlines, and Emirates have cancelled some services to the United States due to concerns the deployment of 5G wireless networks could affect the radio altimeters in the aircraft used on these routes. pic.twitter.com/xkFtRauxCk
— Flightradar24 (@flightradar24) January 18, 2022
5Gचा महावेग, विमान सेवांमध्ये अडथळे!
- अमेरिकन एअरलाइन्स कंपन्यांनी एफएएला पत्र लिहून म्हटले आहे की, 5G नेटवर्कमुळे विमान वाहतुकीसाठी मोठे संकट निर्माण होऊ शकते.
- 5G नेटवर्कच्या लहरी विमानाच्या रेडिओ अल्टिमीटर इंजिन आणि ब्रेक सिस्टममध्ये अडथळे आणू शकतात. या तांत्रिक अडथळ्यांमुळे ज्यामुळे विमानाला धावपट्टीवर उतरण्यास समस्या येऊ शकतात.
- या कंपन्यांमध्ये युनायटेड एअरलाइन्स, अमेरिकन एअरलाइन्स, डेल्टा एअरलाइन्सचा समावेश आहे.
- या विमान कंपन्यांनी पत्रात म्हटले आहे की, “विमानतळाच्या धावपट्टीच्या दोन मैलांच्या परिघात वगळता संपूर्ण अमेरिकेमध्ये कुठेही 5G इंटरनेट सेवा लागू करा.”
#FlyAI: Due to deployment of 5G communications in USA, our operations to USA from India stand curtailed/revised with change in aircraft type from 19th January 2022.
Update in this regard will be informed shortly.
— Air India (@airindiain) January 18, 2022
दुसरीकडे, एअर इंडियाने ट्विट केले की, अमेरिकेत 5G कम्युनिकेशन सेवेच्या उपयोजनासंदर्भात १९ जानेवारीपासून भारत ते अमेरिका दरम्यानची काही उड्डाणे कमी करावी लागतील किंवा बदलावी लागतील. यासंदर्भातील पुढील माहिती लवकरच देण्यात येईल.
ताजी माहिती:
विमानांच्या उड्डाणांमध्ये येणाऱ्या गंभीर समस्यांची माहिती मिळाल्यानंतर आताच मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील एटी अँड टी आणि वेरिझॉन या दोन कंपन्यांनी विमानतळ परिसरातील मोबाइल टॉवर सध्या तरी 5G साठी अपग्रेड करायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमानांसाठीची समस्या तात्पुरती टळली आहे. तरीही भविष्यात मोबाइल कंपन्यांना कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार आहे.