मुक्तपीठ टीम
येत्या एक ऑक्टोबरपासून देशातील प्रत्येक कार आणि एसयूव्ही अशा आठपेक्षा कमी प्रवाशी वाहतूक क्षमता असणाऱ्या वाहनांमध्ये पुढील सीट्सप्रमाणेच मागील कडेच्या सर्व सीट्साठीही एअर बॅग्स बंधनकारक असणार आहेत. मकरसंक्रातीच्या दिवशी १४ जानेवारीला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रोजी एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, “१ ऑक्टोबर २०२२ नंतर उत्पादित एम १ श्रेणीच्या वाहनांना टू साइड/साइड टोर्सो एअर बॅग्स, पुढे बसणाऱ्या व्यक्तींसाठी प्रत्येकी एक, आणि मागे कडेला बसणाऱ्या प्रत्येकी व्यक्तीसाठी एक याप्रमाणे टू साइड/साइड टोर्सो एअर बॅग्स बंधनकारक करण्यात आल्या आहेत”.
एम -१ श्रेणीतील वाहने कोणती?
प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ती मोटार वाहने, ज्यामध्ये चालकाच्या आसनाव्यतिरिक्त, आठपेक्षा अधिक आसने नसतात.
२०१९मध्ये चालकांसाठी एअरबॅग
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, वाहनचालकाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 1 जुलै 2019 आणि त्यापुढील उत्पादित एम 1 श्रेणीतील सर्व मोटार वाहनांसाठी चालक एअरबॅग अनिवार्य केली आहे. एअरबॅग ही, टक्कर झाल्यास वाहनचालक आणि वाहनाच्या डॅशबोर्डमध्ये उघडणारी वाहनातली नियंत्रण प्रणाली आहे. यामुळे गंभीर इजा टाळता येते.
एक जानेवारीपासून पुढच्या आसनावर बसलेल्या व्यक्तीसाठी फ्रंट एअर बॅग!
मंत्रालयाने १ जानेवारी २०२२ पासून सर्व एम १ श्रेणीच्या वाहनांमध्ये, वाहनचालकाव्यतिरिक्त पुढच्या आसनावर बसलेल्या व्यक्तीसाठी फ्रंट एअर बॅगची अंमलबजावणी अनिवार्य केली.
आता १ ऑक्टोबरपासून मागे कडेला बसलेल्या प्रवाशांसाठीही एअर बॅग्स!
मागच्या/बाजूच्या इजांपासून मोटार वाहनातील प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी, केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR), १९८९ मध्ये सुधारणा करून सुरक्षा वैशिष्ट्ये वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात १४ जानेवारी २०२२ रोजी एक मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे, ज्याद्वारे १ ऑक्टोबर २०२२ नंतर उत्पादित एम १ श्रेणीच्या वाहनांना टू साइड/साइड टोर्सो एअर बॅग्स, पुढे बसणाऱ्या व्यक्तींसाठी प्रत्येकी एक, आणि मागे कडेला बसणाऱ्या प्रत्येकी व्यक्तीसाठी एक याप्रमाणे टू साइड/साइड टोर्सो एअर बॅग्स बंधनकारक करण्यात आल्या आहेत.
“साइड/साइड टॉर्सो एअर बॅग” काय असतात?
साइड/साइड टॉर्सो या एअर बॅग म्हणजे फुग्यासारखे रोधक उपकरण, जे वाहनाच्या आतील बाजूच्या आसनावर किंवा बाजूच्या संरचनेत बसवले जाते आणि ते टक्कर झाल्यामुळे पुढच्या रांगेतील कडेच्या व्यक्तीला, मुख्यतः व्यक्तीच्या धडाला होणारी इजा कमी करण्यात आणि/किंवा व्यक्तीला बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी सहायक ठरते.
“साइड कर्टेन/ट्यूब एअर बॅग” काय असतात?
साइड कर्टेन/ट्यूब या एअर बॅग म्हणजे वाहनाच्या आतील बाजूच्या संरचनेत बसवलेले कोणतेही फुगवता येण्याजोगे रोधक उपकरण. जे मुख्यतः डोक्याला दुखापत आणि/किंवा व्यक्तीला वाहनातून बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी उपयुक्त ठरते.
मूळ मसुदा पाहण्यासाठी
https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2022/jan/doc20221154901.pdf