मुक्तपीठ टीम
शेतकरी कर्जमाफी म्हटलं तर काहींना ते सरकारने विनाकारण घेतलेलं ओझ वाटतं. पण भारतातील एका राज्यात चक्क सोन्यावर कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहेत. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या अण्णाद्रमुक या पक्षाने सोन्यावर कर्जमाफीचे आश्वासन तामिळी मतदारांना दिले आहे. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी अण्णाद्रमुकने ४८ ग्रॅमपर्यंतची कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. विरोधातील द्रमुकला सोने कर्जमाफीच्या डावावर काय प्रतिडाव टाकावा, असा प्रश्न पडलाय!
अण्णा द्रमुकच्या सोने कर्जमाफी आश्वासनाचा लाभ निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधील सहकारी संस्थांनी वितरित केलेल्या २० हजार कोटी कर्जापैकी सुमारे ४०% भाग याच सोन्याच्या कर्जाचा आहे.
राज्याच्या राजकारणात सोन्याचे महत्त्व
- तामिळनाडूच्या राजकारणात सोन्याच्या कर्जाला खूप महत्त्व आले आहे, कारण तेथील सहकारी संस्थांची वेगळ्या अर्थपुरवठ्याची स्थिती हे कारण आहे.
- आपल्या सहकारी बँका सहसा शेतीविषयक कर्ज देतात, परंतु तामिळनाडूमध्ये ४० हून अधिक सहकारी बँका, ४ हजारांहून अधिक पतपेढ्या सोने गहाण ठेवण्याच्या बदली कर्ज देतात.
- सहकारी संस्थांकडून वितरित करण्यात आलेल्या २० हजार कोटी कर्जांपैकी सुमारे ७००० कोटी सोन्याच्या कर्जाचे आहे, यावरून सोने कर्जाचे महत्व कळू शकते.
- महिला बचत गटातील सुमारे १५.५ लाख सदस्यांना सोने कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल. अण्णा द्रमुकच्या या आश्वासनामुळे महिलांची मन जिंकण्यात मदत होईल.
दक्षिणेत सोन्याला जास्तच महत्व
- संपूर्ण देशातील एक तृतीयांश हॉलमार्क सेंटर येथे आहेत.
- सोन्याचे दागिने हे दक्षिणेकडील राज्याच्या संस्कृतीचा एक भाग आहे.
- जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा लोक हे सोने गहाण ठेवून सोन्यावर कर्ज घेतात.
- सोने कर्ज माफी ही एक योजना आहे जी इथल्या बर्याच मतदारांना प्रभावित करते.
- दक्षिणेत सोन्याचे पाच-सात मजली शोरूम असतात, जे शॉपिंग मॉल्ससारखे आहेत.
- अनेक बहुमजली शोरूम आहेत जिथे ६ ते ८ क्विंटल सोन्याचे दागिने आहेत.