Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कृषी पीक विमा आणि पतधोरणासाठी UNDPसोबत सामंजस्य करार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Farmers

मुक्तपीठ टीम

भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय,आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यात एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम(UNDP) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी विमा योजना (PMFBY) आणि सुधारित व्याज अनुदान योजना-किसान क्रेडिट कार्ड या योजनांसाठी तांत्रिक सहाय्य प्रदान करणार आहे. त्याचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री कृषी विमा योजनेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी रितेश चौहान आणि यूएनडीपीचे निवासी प्रतिनिधी शोको नोडा यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.या सामंजस्य करारांतर्गत, यूएनडीपी एकत्रित कृषी कर्ज आणि पीक विम्याच्या अंमलबजावणीसाठी कृषी मंत्रालयाला मदत करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करेल आणि जागतिक स्तरावरील आपल्या ज्ञानाचा लाभ मिळवून देईल. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि कृषी सचिव मनोज आहुजा हे देखील या स्वाक्षरी समारंभाला उपस्थित होते.

संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कृषी मंत्रालय देशातील करोडो शेतकर्‍यांच्या हितासाठी योजना पूर्ण पारदर्शकतेने राबवत आहे. याचा थेट लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळत आहे.

तोमर पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांनी पीएमएफबीवाय अंतर्गत २१ हजार कोटी रुपयांचा विम्याचा हप्ता भरला असताना, त्यांना 1.15 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसानभरपाई मिळाली आहे. यावरून हे दिसून येते की प्रधानमंत्री कृषी विमा योजना संपूर्ण शेतकरी समुदायाच्या हितासाठी काम करत आहे. त्याचप्रमाणे, किसान क्रेडिट कार्ड योजनेत ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी योजनेचा लाभ घेता आला नाही, अशा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. सर्व लहान शेतकरी, पशुपालक शेतकरी आणि मच्छीमारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले जात आहे.

या सामंजस्य करारानुसार,लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, भागपीक, भाडेकरू आणि बिगर कर्जदार शेतकरी यांचे हित लक्षात घेऊन,यूएनडीपी कृषी कर्ज आणि पीक विम्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रतिसादात्मक, तसेच मागणीप्रमाणे तांत्रिक सहाय्य प्रदान करेल, त्याचप्रमाणे विद्यमान राष्ट्रीय आणि विविध राज्यातील संस्थांना क्षमता, विकास आणि माहिती, शिक्षण आणि दळणवळण (IEC) यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल.


Tags: Agricultural Crop Insurancegood newsgovernment of indiaMinistry of Agriculture and Farmers WelfareMuktapeethmuktpeethUNDPकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयालकृषी पीक विमाचांगली बातमीभारत सरकारमुक्तपीठ
Previous Post

आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिन: मुंबईत शेतकऱ्यांचा होणार गौरव! 

Next Post

भारतीय लष्कर बीएससी नर्सिंग कोर्ससाठी २२० जागांवर करिअर संधी

Next Post
indian army

भारतीय लष्कर बीएससी नर्सिंग कोर्ससाठी २२० जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!