मुक्तपीठ टीम
सोशल मीडियावर अनेक मनोरंजक तर, काही धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राचील लावणीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर खूप गाजतोय. हा व्हिडीओ गौतमी पाटीलच्या लावणीचा आहे. तिच्या या व्हिडीओने इंस्टाग्रामवर चांगलीच खळबळ उडवली आहे. या सगळ्यात अनेकांच्या मनात प्रश्न आहे की ही गौतमी पाटील कोण? तिच्यावर अनेक वेळा टीकाही होते. लावणी करताना ती करत असलेले हावभाव अश्लिल असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येतात. सध्या मनसेनेही तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
गौतमी पाटीलच्या लावणीवर मनसेचा आक्षेप!
- गौतमी पाटीलच्या लावणीने मोठा वाद निर्माण केला आहे.
- सोशल मीडियासह राजकारणातही तिच्या डान्सची आक्षेपार्ह चर्चा रंगली आहे.
- मनसेनेही तिच्यावर आक्रमक भूमिका मांडली आहे.
- गौतमी पाटील हिच्या विकृत डान्सला आवर घाला अन्यथा गृहमंत्रालयाच्या कार्यालयाच्या काचा फोडण्यात येतील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे.
- गौतमी पाटील हिच्या अश्लिल डान्सवर आक्षेप नोंदवत मनसेने जालन्यातील सेवली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकामार्फत पोलीस महासंचालकांकडे ही तक्रार देण्यात आली आहे.
गौतमी पाटीलच्या लावणीला विरोध करत मनसेने लिहिलं पत्र…
- हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे अनेक कलाकार संस्कृती जपून आपला डान्स सादर करत असतात.
- मात्र, अभिनेत्री गौतमी पाटील ही हेतू पुरस्पर अश्लिल हावभाव दाखवत डान्स करत आहे.
- याचे व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करुन व अश्लीलरित्या अंग प्रदर्शन करून हावभव करत आहे. यामुळे महाराष्ट्रात अश्लीलतेचं वातावरण निर्माण होत आहे.
- चे वाईट परिणाम राज्यातील तरुणांवर होत आहे. म्हणून गौतमी पाटील हिच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी व महाराष्ट्रतृातील गुणी कलाकर यांच्या नावाला कलंक लावू नये, ही विनंती आहे.
सांगलीत गौतमी पाटीलचा डान्स एका तरूणाच्या जीवावर बेतला!
- गौतमी पाटीलचा मागे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात बेडगमध्ये कार्यक्रम झाला.
- या कार्यक्रमात हैदोस घातल्याचे समोर आल्यानंतर एका तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले.
- गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम बेडगमधल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आला होता.
- यावेळी काही प्रेक्षकांनी जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात जिल्हा परिषद शाळेच्या कौलारु छताचा चुराडा झाला.