मुक्तपीठ टीम
मुलगा आर्यन खानला ड्रग्सप्रकऱणी अटक झाल्यामुळे शाहरुख खान अडचणीत आला आहे. त्यानंतर आता बॉलिवूडमधील दुसरा खान आमीर खान संकटात सापडण्याची शक्यता आहे. आमिर खान जाहिरातीसंदर्भातील वादात अडकले आहेत. आमिर खानने ही जाहिरात टायर कंपनी CEAT Limited साठी केली आहे. आमिर खान या जाहिरातीत लोकांना रस्त्यावर फटाके न फोडण्याचा सल्ला देताना दिसतो आहे. भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे की, CEAT कंपनीला नमाजच्या नावाने रस्ता अडवण्याशी संबंधित समस्या आणि अजानच्या वेळी मशिदींमधून येणारा आवाज याचीही आठवण करुन दिली आहे.
भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी CEAT कंपनीचे सीईओ अनंत वर्धन गोयंका यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात “हिंदूंमध्ये संताप” निर्माण करणाऱ्या असं संबोधत या जाहिरातीकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
भाजपाच्या अनंत कुमारांचे मत काय?
- त्यांनी स्पष्ठ केले की आमिर खान लोकांना रस्त्यावर फटाके न फोडण्याचा सल्ला देत आहे, खूप चांगला संदेश देत आहे.
- सार्वजनिक समस्यांवरील तुमच्या चिंतेचे कौतुक केले पाहिजे.
- या संदर्भात मी तुम्हाला विनंती करतो की रस्त्यांवर लोकांची आणखी एक समस्या सोडवा .
- शुक्रवार आणि इतर महत्त्वाच्या सणांच्या दिवशी अनेक भारतीय शहरांमध्ये हे एक सामान्य दृश्य आहे, जेथे मुस्लिमांनी नमाजeच्या नावाने रस्ते अडवतात आणि प्रार्थना करतात.
- रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने देखील त्या वेळी रहदारीमध्ये अडकतात, ज्यामुळे ‘गंभीर नुकसान’ उद्भवते.
मशिदींच्या भोंग्याकडे लक्ष वेधले!
अनंत हेगडे यांनी CEAT कंपनीचे सीईओ अनंत वर्धन गोयंका यांना कंपनीच्या जाहिरातींमध्ये ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करण्यास सांगितले आहे. मशिदींवर लाऊडस्पीकर अज़ान दरम्यान खूप आवाज करतात तो आवाज अनुज्ञेय मर्यादेच्या पलीकडे आसतो. यामुळे विविध आजारांनी त्रस्त लोक, विविध आस्थापनांमध्ये काम करणारे लोक आणि वर्गात शिकवणारे शिक्षक यांची खूप गैरसोय होत आहे. शुक्रवारी तर हाच आवाज आणखी काही काळ वाढवला जातो.
हिंदूविरोधी अभिनेते!
हेगडे यांनी स्पष्ठ केले की, ‘हिंदूविरोधी अभिनेत्यांचा’ एक गट नेहमी हिंदूंच्या भावना दुखावतो, तर ते समुदायाच्या चुकीच्या गोष्टी उघड करण्याचा कधीही प्रयत्न करत नाहीत. हेगडे यांनी CEAT कंपनीचे सीईओ अनंत वर्धन गोयंका यांना विनंती करत विशिष्ट घटनेकडे लक्ष द्या, जिथे तुमच्या कंपनीच्या जाहिरातीमुळे हिंदूंमध्ये वाद निर्माण झाला आहे.