Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘भारत जोडो’ नंतर काँग्रेसचं ‘हाताशी हात जोडा…’! हे नेमकं काय?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
congress

मुक्तपीठ टीम

भारतात सध्या ‘भारत जोडो यात्रा’ सुरू असतानाच आता २६ जानेवारीपासून देशभरात ‘हाताशी हात जोडा’ ही मोहीमही सुरू करण्यात येणार आहे. याबाबत कॉंग्रेस पक्षाने माहिती दिलेली आहे. तसेच येत्या फेब्रुवारीत म्हणजेच २०२३मध्ये छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे काँग्रेसचे तीन दिवसीय अधिवेशन होणार आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्ष संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, हे अधिवेशन फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणार असून त्यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

२६ जानेवारीपासून देशभरात ‘हाताशी हात जोडा’ मोहीम सुरू!

‘भारत जोडो यात्रा’ संपल्यानंतर पुढील महिन्यात २६ जानेवारीपासून देशभरात ‘हाथ से हाथ जोडो’ मोहीम सुरू केली जाईल. असे केसी वेणुगोपाल म्हणाले, या अंतर्गत ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर लोक सहभागी होतील, असा निर्णय पक्षाने घेतला आहे. संपर्क बनवले जाईल. दोन महिने चालणाऱ्या या मोहिमेत राहुल गांधींचा संदेश असलेले एक पत्रही लोकांना देण्यात येणार आहे.

‘हाताशी हात जोडा मोहीम’ तीन स्तरांवर राबविण्यात येणार

  • कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, ‘भारत जोडो’ यात्रा २४ डिसेंबरला दिल्लीत पोहोचेल आणि २६ जानेवारीला श्रीनगरमध्ये संपेल.
  • ‘हाताशी हात जोडा’ मोहीमेअंतर्गत तीनस्तरीय कार्यक्रम आयोजित केले जाईल.
  • ब्लॉक आणि बूथ स्तरावर यात्रा, जिल्हास्तरावर अधिवेशने आणि राज्यस्तरावर रॅली होतील.

बैठकीत संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काँग्रेस सुकाणू समितीच्या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट हे अधिवेशन केव्हा होणार आणि ते कोठे होणार हे ठरवणे आहे.” या विषयावर चर्चा केली जाईल. सुकाणू समितीच्या या महत्त्वाच्या बैठकीत संघटनात्मक बाबींवरही चर्चा झाल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

 


Tags: २६ जानेवारीBharat Jodo YatraCongressCongress Steering CommitteeHath se hath Jodo CampaignJanuary 26muktpeethकाँग्रेसकाँग्रेस सुकाणू समितीघडलं-बिघडलंभारत जोडो यात्रामुक्तपीठहाताशी हात जोडा मोहीम
Previous Post

भारतीय नौदल दिवस…जाणून घ्या महत्व!

Next Post

नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने टिपला सूर्यापेक्षा १०० अब्ज पट तेजस्वी आकाशगंगांचा संगम!

Next Post
galaxy

नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने टिपला सूर्यापेक्षा १०० अब्ज पट तेजस्वी आकाशगंगांचा संगम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!