Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांना पोलिसांनी ९ तास बसवून ठेवले! अमित शाह यांच्या फोननंतर झाली सुटका!!

March 6, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
NARAYAN RANE MALWANI

मुक्तपीठ टीम

दिशा सालियन मृत्यूबद्दल वादग्रस्त विधानांमुळे महिला आयोगाच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास नारायण राणे आणि नितेश राणे चौकशीसाठी त्या पोलीस ठाण्यात गेले होते. तब्बल ९ तासांच्या चौकशी नंतर राणे पिता-पुत्रांना पोलिसांनी सोडले. पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना, “केंद्रीय मंत्री, आमदार असूनही बसवून ठेवलं होतं. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोललो, त्यांनी एक फोन केला, मग आमचा जबाब नोंदवला,” असं सांगितलं.

 

दिशा सालियनबद्दल बोलल्यामुळेच दबावाखाली गुन्हा

  • मला दोन दिवसांपूर्वी 41A ची नोटीस आली होती, आपलं म्हणणं सागण्यासाठी यावे अशी नोटीस होती.
  • त्यात असे म्हटले होते की, दिशा सालियानच्या आईने तक्रार केली असल्याने तुम्हाला यावं लागेल.
  • मी आणि नितेश काय बोललो, तिची आत्महत्या नाही हत्या आहे, हे आम्ही वारंवार बोलत आहोत.
  • त्यानंतर मुंबईच्या महापौरांनी त्यांच्या कुटुंबियांना तक्रार करायला भाग पाडलं.
  • आमची बदनामी होतेय, अशी तक्रार केली. खोटी तक्रार केली.
  • पोलीस स्टेशनने ती केस घेतली आणि आम्हाला बसवलं. मागील ९ तास आम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतो.”
  • मी सांगतोय वारंवार की मी केंद्रीयमंत्री आहे, नितेश राणे आमदार आहेत.
  • आम्हाला अधिकार आहे कोणावर अन्याय होत असेल, दिशा सालियानवर अन्याय झाला.
  • तिला न्याय मिळावा अशी आमची मागणी असातनाही आमच्यावर केस करण्यात आली.
  • आम्ही अटकपूर्व जामीन घेतलेला आहे.
  • पण याबाबत मात्र आम्ही शेवटपर्यंत जाणार.
  • शेवटी मी गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला आणि त्यानंतर आम्हा दोघांनाही आमचे स्टेटमेंट पूर्ण झाल्यानंतर बाहेर सोडलेलं आहे

 

नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंबद्दल गौप्यस्फोट

  • सुशांतची हत्या झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला.
  • सुशांतच्या केसबद्दल आणि एका मंत्र्याची गाडी होती या बद्दल बोलू नका.
  • तुम्हालाही मुले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
  • मात्र पोलिसांनी माझं हे वाक्य जबाबातून वगळलं.
  • मात्र आम्ही अन्यायाविरुद्ध लढत राहणार.

Tags: Amit Shahcm uddhav thackerayDisha SalianMalwani Police StationNarayan ranenitesh raneअमित शाहादिशा सालियननारायण राणेनितेश राणेमालवणी पोलीस स्टेशनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये ९७ जागांवर करिअर संधी

Next Post

प्लास्टिक प्रदूषणमुक्ती, भारतासोबत १७५ देशांची शक्ती!

Next Post
प्लास्टिक प्रदूषणमुक्ती, भारतासोबत १७५ देशांची शक्ती!

प्लास्टिक प्रदूषणमुक्ती, भारतासोबत १७५ देशांची शक्ती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!