मुक्तपीठ टीम
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाना आळा घालण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली. या नोटाबंदीमुळे चलनातून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा तात्काळ बंद करण्यात आल्या होत्या. नोटाबंदीपूर्वी म्हणजेच ४ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात १७.९७ लाख रुपयांची रोकड होती. जी सहावर्षानंतर वाढून ३०.८८ कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
देशात रोख चलनाने विक्रमी पातळी गाठली !!
- सहा वर्षांनी देशात रोख चलनाने विक्रमी पातळी गाठली आहे.
- २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत संपलेल्या पंधरवड्यात देशातील जनतेकडे ३०.८८ लाख कोटी रुपयांची रोकड नोंदवली आहे.
- नोटाबंदीच्या सहा वर्षानंतरही, देशात बहुतांश लोकं रोख रक्कम वापरणं पसंत करत आहेत.
- २५ नोव्हेंबर २०१६ नोटाबंदीनंतर लोकांकडे ९.११ लोख कोटीची रोख रक्कम होती, जी आता २३९ टक्क्यांनी वाढली आहे.
सहावर्षांपूर्वी केली होती नोटाबंदी-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता नोटाबंदीची घोषणा केली होती. अर्थव्यवस्थेतील ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून तात्काळ बंद केल्या होत्या.
- भारताला ‘कॅशलेस’ अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले होते.
- यावेळी सर्वसमान्यांना बँका आणि एटीएमबाहेर लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागले.
- नोटाबंदीला ६ वर्षे पूर्ण झाली, मात्र तरीही लोक लोक रोख पैसे भरणे पसंत करत आहेत.
आरबीआयने रोख रकमेबाबत अहवाल जारी केला-
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी जारी केलेल्या पैशांच्या पुरवठ्यावरील आकडेवारीनुसार, यावर्षी २१ ऑक्टोबरपर्यंत, लोकांकडील रोख चलन ३०.८८ लाख कोटीपर्यंत वाढले आहे.
- ४ नोव्हेंबर २०१६ रोजी संपलेल्या पंधरवड्यात हा आकडा १७.७ लाख कोटी रुपये होता.
- एकूण चलनातील चलनातून बँकांकडे असलेली रोकड वजा केल्यास लोकांमध्ये किती चलन आहे हे कळते.
- विशेष म्हणजे, नवीन आणि सोयीस्कर डिजिटल पेमेंट पर्यायांची लोकप्रियता असूनही, अर्थव्यवस्थेत रोख रकमेचा वापर सातत्याने वाढत आहे.