मुक्तपीठ टीम
कृषी विभागाने शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाचा सल्ला दिला आहे. राज्यभरात पावसाचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने वर्ध्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
काय सांगितले कृषी विभागाने
- अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते.
- ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते.
- त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे, आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
- तसेच खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत, असेही कृषी विभागाने सांगितले आहे.
खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरी केली. मात्र हवामान खात्याने नागपुरात जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तोपर्यंत बियाणांची पेरणी करु नये, असं कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. घाईघाईने बियाणे पेरल्यास ते वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काही काळ धीर धरावा, असे आवाहन कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.